शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

मतविभागणीवर ठरणार विजयाचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:05 PM

बागलाण मतदारसंघात निवडणूक रिंगणात पाच उमेदवार असले तरी भाजप-सेना महायुतीचे उमेदवार माजी आमदार दिलीप बोरसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार आमदार दीपिका चव्हाण यांच्यातच सरळ लढत होईल, असे चित्र आहे.

ठळक मुद्देआजी-माजी आमदारांत लढत : शेती, सिंचनाच्या समस्येभोवती फिरतोय प्रचार

नितीन बोरसेबागलाण मतदारसंघात निवडणूक रिंगणात पाच उमेदवार असले तरी भाजप-सेना महायुतीचे उमेदवार माजी आमदार दिलीप बोरसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार आमदार दीपिका चव्हाण यांच्यातच सरळ लढत होईल, असे चित्र आहे. गेल्या निवडणुकीत तब्बल अकरा उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी भाजप, राष्ट्रवादी, कॉँग्रेस, शिवसेना, मनसे, बसपा या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होती. अखेरच्या चरणात मात्र भाजप व राष्ट्रवादीत चुरशीचा सामना झाला. त्यावेळी मतविभागणीचा राष्ट्रवादीला फायदा झाला; मात्र यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार आमदार दीपिका चव्हाण यांचा चांगलाच कस लागणार आहे. बागलाण हा शेतकरी, आदिवासी, मजूर, मध्यमवर्गीय मतदारांचा मतदारसंघ आहे. या भागातील मतदार शेतीव्यवसायाशी निगडित असल्यामुळे साहजिकच शेती आणि पाणी समस्या हे कळीचे मुद्दे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक कोणतीही असो या प्रश्नांभोवतीच फिरत असते.तालुक्यातील हरणबारी उजवा-डावा कालवा, तळवाडे-भामेर पोहोच कालवा, केळझर चारी क्रमांक आठ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना तत्कालीन युती शासनाच्या काळात मंजुरी मिळून कामाला सुरुवात झाली. त्यानंतर तब्बल पंधरा वर्षे ही कामे रखडली. दरम्यानच्या काळात युतीची सत्ता आली. या भागाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी या प्रश्नांना हात घालण्याचा प्रयत्न केला; मात्र श्रेयवादाच्या लढाईत या कामांना खीळ घालण्याचे प्रयत्न झाल्याचे आरोप केले जातात. राजकारणात पूर्णपणे सक्रिय झालेले माजी आमदार दिलीप बोरसे यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळून युतीला ७२ हजारांचे मताधिक्य मिळवून दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. राष्टÑवादीच्या उमेदवार दीपिका चव्हाण आपल्या कामांचा हिशेब मतदारांसमोर मांडत आहेत. पण, अखेरच्या चरणात बोरसेंना रोखण्यासाठी चव्हाण कोणते अस्त्र वापरतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. यंदा मात्र बागलाणमधील लढत चुरशीची होणार हे निश्चित.मतदारसंघातीलकळीचे मुद्देशहराबाहेरून जाणारा बाह्य वळण रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित.४सटाणा शहरासाठी मंजूर असलेल्या पुनंद पाणीपुरवठा योजनेचे राजकारण.४रखडलेला खमताणे औद्योगिक वसाहतीचा प्रश्न.४मोसम, आरम, हत्ती व कान्हेरी नदीवर केटीवेअर बंधारे.बोरसे पराभवाचा वचपा काढणार का ?गेल्या निवडणुकीत भाजपने अचानक माजी आमदार दिलीप बोरसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली; मात्र त्यांचा अल्प मतांनी पराभव झाला. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी बोरसे गेल्या पाच वर्षांपासून मेहनत घेत आहेत. यंदा महायुती झाल्याने मतांची विभागणी टळण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांतील कामांखेरीज विद्यमान आमदार नाराजांची मनधरणी कशी करतात, यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. त्यामुळे ही लढतही रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.बदललेली समीकरणेमतदारसंघाच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये बागलाण स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. यापूर्वी बागलाणची ३८ गावे कळवण मतदारसंघात होती, तर देवळा तालुक्यातील १२ गावे बागलाण मतदारसंघात होती. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली.भौगोलिकदृष्ट्या हा मतदारसंघ मोसम, आरम, करंजाडी, काटवण आणि पश्चिम आदिवासी पट्टा या पाच भागात विभागला गेला आहे. बागलाणचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मोसम खोऱ्याला जास्त मिळाली आहे.बागलाणचे पहिले आमदार सजन राघो पाटील यांच्या रूपाने काटवणला एकदा मान मिळाला आहे. आरम खोºयाला १९८४ मध्ये बसवाहक रुं जा पुंजा गांगुर्डे, त्यानंतर २००४ मध्ये अजमीर सौंदाणे येथील संजय चव्हाण, तर २०१४ मध्ये दीपिका चव्हाण यांच्या रूपाने मान मिळाला.ोल्या निवडणुकीत तब्बल साडेबावीस हजार मतांचे विभाजन झाले. त्यामुळे या निवडणुकीत मतविभागणी टाळण्यासाठी युतीने सुरुवातीपासूनच व्यूहरचना केली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे राकेश घोडे यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यांचा राष्टÑवादीला फटका बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019baglan-acबागलाणDeepika Chavanदिपिका चव्हाणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस