‘मातृऋण पुरस्कार’ वितरण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:21 AM2018-05-07T00:21:28+5:302018-05-07T00:21:28+5:30

नाशिक : कोणत्याही क्षेत्रात चांगले नैपुण्य मिळविणाऱ्या व्यक्तीच्या प्रगतीमध्ये सर्वांचे योगदान असते; परंतु त्यात सर्वात जास्त महत्त्वाचा वाटा आईचा असतो. क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवण्यासाठी खेळाडूंना जी मेहनत घ्यावी लागते त्यात मातांचाही फार मोठा त्याग असतो, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले.

'Maternity Award' distribution ceremony | ‘मातृऋण पुरस्कार’ वितरण समारंभ

‘मातृऋण पुरस्कार’ वितरण समारंभ

Next
ठळक मुद्देदराडे : कार्यक्षम व्यक्तीच्या मागे त्याच्या मातेचा सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राच्या शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंच्या मातांना आकर्षक चषक आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित

नाशिक : कोणत्याही क्षेत्रात चांगले नैपुण्य मिळविणाऱ्या व्यक्तीच्या प्रगतीमध्ये सर्वांचे योगदान असते; परंतु त्यात सर्वात जास्त महत्त्वाचा वाटा आईचा असतो. क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळवण्यासाठी खेळाडूंना जी मेहनत घ्यावी लागते त्यात मातांचाही फार मोठा त्याग असतो, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी केले.
कै. के. एन. डी. बहुद्देशीय मंडळाच्या वतीने महेश भवन येथे महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या मातांसाठी ‘मातृऋण पुरस्कार’ वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, या समारंभाप्रसंगी ते बोलत होते. खेळाडूंचा आहार, त्यांच्यावरील संस्कार, त्यांना प्रेरणा देणे, पाठिंबा देणे या गोष्टींमध्ये मातांचाही मोठा सहभाग असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा समीक्षक आनंद खरे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राच्या शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंच्या मातांना आकर्षक चषक आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अशोक दुधारे यांनी प्रास्तविक, तर विजया दुधारे यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम दुधारे यांनी आभार मानले. यावेळी अतिका जामदार, कांताबाई तागडे, दीप्ती आशर, मंगल अष्टपुत्रे, चित्रा शेळके, उषा पाटील, धनश्री भोकनळ, नलिनी गुल्हाणे, उज्ज्वला शिंदे, शीतल तळेकर, देविका महाजन, वनमाला डोंगरे, निकिता गुजराथी, रामा शहारे, नमिता गद्रे, तारा रंत्रे, भाग्यश्री बेंदेवार, माया चव्हाण, आशालता कोरे, विजया दुधारे, आदींचा सत्कार करण्यात आला.

Web Title: 'Maternity Award' distribution ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा