मेळा बसस्टॅण्डजवळ जातिवाचक शिवीगाळ करून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:14 IST2018-10-21T00:14:39+5:302018-10-21T00:14:58+5:30

सीबीएसजवळील मेळा स्टॅण्डच्या पत्र्याजवळ एकास जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे़

A massacre at the Mela bus stop | मेळा बसस्टॅण्डजवळ जातिवाचक शिवीगाळ करून एकास मारहाण

मेळा बसस्टॅण्डजवळ जातिवाचक शिवीगाळ करून एकास मारहाण

नाशिक : सीबीएसजवळील मेळा स्टॅण्डच्या पत्र्याजवळ एकास जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे़ पाथर्डी फाट्यावरील तेजल क्लासिकमधील रहिवासी प्रवीण देढे हे मंगळवारी (दि़१६) दुपारी तीन वाजेच्या सुमारास मेळा बस स्टॅण्ड पत्र्याच्या शेडजवळ उभे असताना संशयित केशव बोरस्ते (रा़ मिग साकुरे, ता़ निफाड) याने जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच मारहाण करून निघून गेला़ या प्रकरणी देढे यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित बोरस्ते विरोधात जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: A massacre at the Mela bus stop