विवाहाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 23:31 IST2018-12-05T23:31:03+5:302018-12-05T23:31:26+5:30
नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून विवाहितेस पळवून नेत तिच्या मुलास ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी संशयित विष्णू सदाशिव सोनवणे (रा. मु. पो. चाटोरी, ता. निफाड, जि. नाशिक) याच्यासह त्याचा भाऊ, आई व इतर दोन महिलांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

विवाहाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार
नाशिक : विवाहाचे आमिष दाखवून विवाहितेस पळवून नेत तिच्या मुलास ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी संशयित विष्णू सदाशिव सोनवणे (रा. मु. पो. चाटोरी, ता. निफाड, जि. नाशिक) याच्यासह त्याचा भाऊ, आई व इतर दोन महिलांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सरकारवाडा पोलीस ठाण्यात २८ वर्षीय पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित विष्णू सोनवणे याने २ ते ११ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत विवाहाचे आमिष दाखवून पळवून नेले़ यानंतर मुलास ठार मारण्याची धमकी देऊन शहरातील रविवार कारंजावरील हेरंब गेस्ट हाऊस, अंधेरी येथील ब्लिस कम्फर्ट हॉटेल, मुंबईतील अनुषा हॉटेल यासह कसारा, इंदिरानगर व नाशिकरोड परिसरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.
या प्रकरणात संशयित विष्णू सोनवणे यास त्याचा भाऊ भाऊसाहेब सदाशिव सोनवणे व आई इंदूबाई सदाशिव सोनवणे यांच्यासह भारती भाऊसाहेब सोनवणे व अर्चना विष्णू सोनवणे (सर्व रा. मु. पो. चाटोरी, ता. निफाड, जि. नाशिक) यांनी सहकार्य करून तक्रार नोंदविल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.