मरळगोईच्या शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:19 IST2019-06-14T01:18:34+5:302019-06-14T01:19:47+5:30
मरळगोई खुर्द येथील शेतकरी किरण साहेबराव बनसोडे (३२) या शेतकºयाने गुरुवारी (दि.१३) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गोई नदी तीरावर गावच्या भागातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला.

मरळगोईच्या शेतकऱ्याची आत्महत्या
लासलगाव : येथून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मरळगोई खुर्द येथील शेतकरी किरण साहेबराव बनसोडे (३२) या शेतकºयाने गुरुवारी (दि.१३) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गोई नदी तीरावर गावच्या भागातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला.
याबाबत मरळगोई येथील पोलीसपाटील दौलत हिरामण बनसोडे यांनी लासलगाव पोलिसांना खबर देताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेकरिता पाठविला. पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून, अधिक तपास लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक एस. के. पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इप्पर करीत आहेत.