शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बाप्पांसाठी आकर्षक अलंकार बाजारात

By admin | Updated: September 12, 2015 23:23 IST

नावीन्यपूर्ण दागिन्यांची ग्राहकांना भुरळ : देखाव्यांचे काम अंतिम टप्प्यात

नाशिक : अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. घरगुती गणपतींबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सार्वजनिक मंडळांची देखावे पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू आहे. घराघरातून मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी आकर्षक आरास बनविण्यासाठी घरातील सगळेच सदस्य जोमाने कामाला लागले असल्याचे चित्र शहर परिसरात बघायला मिळते.‘कोटी कोटी रूपे तुझी - कोटी सूर्य चंद्र तारे’ या उक्तीप्रमाणे गणपती बाप्पांना सजविण्यासाठी बाजारात अनोखी आभूषणे तसेच कलात्मक दागिने विक्रीसाठी दाखल झाले आहेत.घरात पाहुणा म्हणून येणारा बाप्पा भाविकांकडे अर्धा, दीड, तीन, पाच, सात दिवस तर बहुतांश ठिकाणी अनंत चतुर्दशीपर्यंत विराजमान असतात. पाहुणा म्हणून आलेल्या बाप्पांचे यथोचित स्वागत व्हावे, घरात मंगलमयी वातावरण रहावे यासाठी प्रत्येक भाविक आपापल्या परीने योग्य ते नियोजन करत असतो.घरगुती गणेशोत्सवासाठी शहरातील बाजारपेठेत देखाव्यात मांडता येण्यासाठी, तसेच बाप्पांना सजविण्यासाठी अनेक शोभिवंत प्रकार दाखल झाले आहेत. यामध्ये पाच ते सहा प्रकारांचे विविध आकारातील उंदीर, मोदकांचे विविध प्रकार यामध्ये तीन आणि पाच मोदकांचा समूह, जाळीचा मोदक, उदबत्तीच्या घरासारखे भासणारे मोदक, विड्याच्या पानावर साकारलेल्या गणपतीच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती तसेच आंब्याच्या आणि पिंपळाच्या पानावर साकारलेले अष्टविनायक गणपती दर्शन भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. गणपती अधिकाधिक आकर्षक दिसावा यासाठी बाप्पांच्या सोंडेवर अगदी सहजतेने अडकवता येतील असे अलंकार, नैवेद्य दाखविण्यासाठी केळीचे पान, बाप्पांच्या कानांवर असणाऱ्या अलंकारांपैकी गजकर्णाचीदेखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे.गणपतीची मखर आणि देखावा आकर्षक दिसण्याच्या उद्देशाने सुपारी, त्रिशूळ, ओम, परशु, केवड्याचं पान, मोदक हार यांच्या बरोबरच बाप्पांच्या मस्तकावर शोभून दिसेल असे अनेक मुकुटही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. बाजारात ही आभूषणे ८० रुपयांपासून ते ७५० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे. मराठी आणि हिंदी मालिकांचा प्रभाव गणपती मूर्तीप्रमाणेच अलंकाराच्या बाबतीतही पडलेला दिसून येतो. बाजारात दाखल झालेले दागिने प्रामुख्याने राजकोट, पुणे, मुंबई, वडोदरा या बाजारपेठांतून विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. तसेच काही अलंकार हस्तकलेतून तयार करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या दोन महिने आधीपासूनच बाप्पांचे दागिने बनविणे आणि दागिन्यांची दुकाने थाटण्यात आलेली आहेत. हे दागिने मायक्रो पॉलिशपासून बनविले असून या दागिन्यांचे पॉलिश दीर्घकाळ टिकून राहात असल्याचे विके्रत्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.पूर्वीच्या काळी हस्तकलेपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात वापरल्या जात; परंतु पुरुषांप्रमाणेच स्त्रियाही कामानिमित्त बाहेर पडू लागल्याने ‘रेडिमेड’ वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा विशेष कल दिसून येतो. (प्रतिनिधी)