शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठीची गोडी

By admin | Updated: February 27, 2017 00:31 IST

नाशिक : इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेची पुस्तके वाचनाची गोडी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

नाशिक : एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न होत असूनही अद्याप त्याला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यातच बहुतांश पालकांची आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी धडपड चाललेली असताना इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मात्र मराठी भाषेची पुस्तके वाचनाची गोडी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. तसेच पुस्तक प्रदर्शनातून आणि वाचनालयामधूनदेखील मराठी भाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक मुलांसाठी आपल्या मायमराठीचीच पुस्तके नेताना दिसतात, असे मत मराठा भाषा अभ्यासकांनी व्यक्त केले.आधुनिक काळात इंटरनेट फेसबुक, ट्विटर आणि मोबाइलवरील विविध अ‍ॅप्स यामुळे समाज जीवनाचा दैनंदिन आचार, विचार आणि उच्चार म्हणजे भाषेचा ढाचाच बदलून गेल्याचे दिसून येते. त्यातच मराठी भाषेला अवकाळ आली असून, ती शेवटची घटका मोजत आहे, असे गेल्या २0 ते २५ वर्षांपासून म्हटले जात आहे. भाषेतील कला, साहित्य आणि अन्य माध्यमांकडून याबाबत भीतीदायक चित्र उभे केले जात होते. परंतु आता ही भीती दूर झाली असून, मराठी भाषेला काहीही धोका नाही किंबहुना असा धोका नव्हता. यासंबंधी चर्चा करताना मराठी भाषा व संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. प्रा. सदानंद मोरे यांनी सांगितले की, मराठी भाषा ही जगातील १७व्या क्रमांकाची भाषा असून, तिचा उगम मध्यमयुगीन मानला जात असला तरी इ.स.च्या पहिल्या शतकापासून या भाषेचे पुरावे सापडतात. त्यामुळे मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या सद्यस्थितीबद्दल भाष्य करताना मराठी विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. विजया वाड म्हणाल्या की, मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराची सुरुवात आपल्या कुटुंबापासूनच व्हायला हवी. मुलांना मराठीतील चांगली पुस्तके वाचनासाठी द्यायला हवीत. साने गुरुजी, विनोबा भावे, विं. दा. करंदीकर, आचार्य अत्रे, कुसुमाग्रज आदिंची पुस्तके मुलांनी आणि पालकांनी अवश्य वाचली पाहिजे आणि पुस्तक प्रदर्शन तसेच वाचनालयातून मराठी माध्यमातील मुलांबरोबर इंग्रजी माध्यमातील आपल्या मुलांसाठीही पालक मराठीची पुस्तके मोठ्या प्रमाणावर नेतात, असा सुखद अनुभव आहे. यासंबंधी नाशिकमधील सार्वजनिक वाचनालय नाशिक, कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय, टिळक वाचनालय, सुभाष वाचनालय, मृत्युंजय वाचनालय, शासकीय कर्मचाऱ्यांचे वाचनालय आदि वाचनालयांत मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषिक पुस्तके असून, त्यापैकी ८0 टक्के वाचकांकडून मराठी पुस्तकांनाच मागणी असते.