Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्याची नाशिकमध्ये शपथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 16:18 IST2021-05-05T16:16:55+5:302021-05-05T16:18:36+5:30
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने मराठा समाजाच्या वतीने तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आता तीव्र आंदोलने करण्यात येतील अशा भावना समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केल्या.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्याची नाशिकमध्ये शपथ
नाशिक - मराठा आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याने मराठा समाजाच्या वतीने तीव्र भावना व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आता तीव्र आंदोलने करण्यात येतील अशा भावना समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केल्या. आज रात्री समाजाची ऑनलाइन बैठक होणार असून त्यात आंदोलनाची भूमिका ठरविण्यात येईल असे मराठा क्रांती समाजाचे समनव्ययक करण गायकर यांनी सांगितलं. नाशिक शहरातील पंचवटी कारंजा येथे शिव पुतळ्या समोर समाजाच्या स्थानिक नेत्यांनी आरक्षणाचा लढा पुन्हा नव्या जोमाने लढण्याची शपथ घेतली.
कॉ राजू देसले, कारण गायकर आणि अन्य नेते यावेळी उपस्थित होते.