Maratha Reservation: मराठा आरक्षण: नाशिकात उपमुख्यमंत्री अजित पवारांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 10:55 IST2021-07-01T10:54:03+5:302021-07-01T10:55:05+5:30
Maratha reservation, Ajit pawar news: आंदोलकांमध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते देखील होते. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुरु होती.

Maratha Reservation: मराठा आरक्षण: नाशिकात उपमुख्यमंत्री अजित पवारांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न
नाशिक : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यामुळे आज उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा जात असताना शहरातील अशोक स्तंभ चौकात काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ताफा येण्याआधीच या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आंदोलकांमध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते देखील होते. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुरु होती. अजित पवारांचा ताफा अडविण्यासाठी आंदोलक प्रयत्नशील होते. मात्र, पोलिसांनी ताफा येण्याआधीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.