शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

मराठा क्रांती मोर्चाकडून पुन्हा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा ; प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 4:01 PM

सारथी संस्थेची स्वायत्ताही काढून घेण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृहाची मागणीही अद्याप पूर्ण झालेली नाही, यासह मराठा समाजाच्या विविध मागण्या अजूनही प्रलंबित असून या मागण्या तत्काळ पूर्ण झाल्या नाही तर ९ ऑगस्टपासून मराठा समाज पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन सुरु करेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून सरकारला देण्यात आला आहे. 

ठळक मुद्देमराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची ऑनलाईन बैठकप्रलंबित मागण्यांसह विविध विषयांवर चर्चा राज्यभरातील समन्वयकांचा सहभाग

नाशिक : कोपर्डीतील अत्याचार प्रकरणातील पिडिता अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असून सारथी संस्थेची स्वायत्ताही काढून घेण्यात आली आहे. तसेच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतिगृहाची मागणीही अद्याप पूर्ण झालेली नाही, यासह मराठा समाजाच्या विविध मागण्या अजूनही प्रलंबित असून या मागण्या तत्काळ पूर्ण झाल्या नाही तर ९ ऑगस्टपासून मराठा समाज पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन सुरु करेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून सरकारला देण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने निकाल लागल्यानंतर आता ७ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर राज्य शासनाने पूर्ण ताकदीनिशी मराठा आरक्षणाची बाजू मांडावी, असा ठराव मराठा क्रांती मोर्चाच्या शनिवारी (दि.२७) झालेल्या ऑनलाईन बैठकीत मांडण्यात आला. त्याचप्रमाणे मराठा आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सरकारने त्वरित पूर्ण करावी, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळमार्फत थेट कर्ज देण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू करावी व त्यासाठी वाढीव निधीची तरदूद करण्याची मागणी यावेळी पुढे आली. ४७ दिवस आजाद मैदानावर २०१४ इएसबीसी  उमेदवारांचा विषय सरकारने तात्काळ मार्गी लावण्यासाठी सरकारकडे मागणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.  खोट्या अ‍ॅट्रॉसिटीच्या घटनांबाबत याबैठकीत गांभीर्याने चर्चा झाली. सोशल मीडिया वर महिलांच्या अपमानाचाही यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.  या ऑनलाईन बैठकीला मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, नाशिक,जळगाव, जालना, नागपूर, अकोला, नंदुरबार येथील वीरेंद्र पवार, विनोद पाटील, राजेंद्र्र कोंढरे, दिलीप पाटील, विनोद साबळे, अंकुश कदम, करण गायकर, माऊली पवार,  रवी मोहिते, दिलीप देसाई, राजेंद्र दाते-पाटील, अप्पासाहेब कुढेकर-पाटील आदी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNashikनाशिकreservationआरक्षण