शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात अनेक अधिकारी गैरहजर

By admin | Updated: March 30, 2017 01:21 IST

येवला : येथील पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणाऱ्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो.

येवला : येथील पंचायत समिती कार्यालयात अधिकारी उशिरा येणे व लवकर निघून जाण्याचा प्रकार नियमित झाला असल्याने येथे येणाऱ्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. बुधवारी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्टिंग आॅपरेशन केले असता कार्यालयातील जवळपास अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या खुर्च्या रिकाम्या असल्याचे आढळून आल्याने, गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्या दिवसाची बिनपगारी रजा करण्याची मागणी मोहन शेलार यांनी केली आहे.येवला पंचायत समितीमधील काही अधिकारी व कर्मचारी बाहेरगावाहून ये-जा करीत असल्याने त्यांना कार्यालयात पोहचण्यासाठी उशीर होतो. काही कर्मचारी मनमानी पद्धतीने दांडी मारतात. यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना, लाभार्थींना ताटकळत बसावे लागते. यासंदर्भात पंचायत समिती सदस्यांकडे अनेकांनी तक्रारी केल्याने बुधवारी स्टिंग आॅपरेशन केले असता सर्व कार्यालयच खाली आढळून आले.  पंचायत समिती कर्मचारीवर्गाची कार्यालयीन वेळ तशी सकाळी १० ते ५ असते. मात्र १२ वाजेपर्यंत काम करण्याचा मुहूर्त मिळत नाही. ग्रामीण भागातून येणारे लोक सकाळी १० पासून पंचायत समितीत कर्मचाऱ्यांची वाट पाहत असल्याचे विदारक चित्र येवला पंचायत समितीत पाहायला मिळते. सकाळी ११ वाजता सदस्य मोहन शेलार यांनी अचानक भेट देऊन हजेरी रजिस्टर व हालचाल रजिस्टर तपासले असता कर्मचारीवर्गाची चांगलीच धांदल उडाली. शिक्षण विभागात शिक्षण अधिकारी हजर होते. मात्र विस्तार अधिकारी यांनी हालचाल रजिस्टरमध्ये २७ तारखेला सायंकाळीच नोंद करून २९ तारखेला शाळा भेटीसाठी जाणार असल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्ष शाळेवर मात्र संबंधित विस्तार अधिकारी गेलेले नसल्याचे शेलार यांनी सांगितले. आरोग्य विभागात आरोग्य अधिकारीच कार्यालयात हजर नव्हते. चौकशी केली असता आरोग्य अधिकारी नाईकवाडी यांच्याकडे अंदरसूल आरोग्य केंद्राचा चार्ज असल्याने ते अंदरसूलला असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अंदरसूल आरोग्य केंद्रात फोन करून चौकशी केली असता तेथे फोन उचलायलाच कोणी उपस्थित नसल्याचे लक्षात आले. तेथील कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून विचारले असता आरोग्याधिकारी नाईकवाडी अंदरसूल आरोग्य केंद्रातही उपस्थित नसल्याची माहिती मिळाली.  अशीच परिस्थिती पशुसंवर्धन विभागात आढळली. संपूर्ण पशुसंवर्धन कक्ष रिकामा होता. वित्त विभागातही केवळ एकच कर्मचारी हजर होता. (वार्ताहर)