शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अनेक नगरसेवक कुंपणावर

By admin | Updated: September 10, 2016 01:19 IST

प्रभाग रचनेची प्रतीक्षा : १० आॅक्टोबरनंतर उलथापालथ शक्य

 नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांना प्रभाग रचनेची प्रतीक्षा असून प्रारुप प्रभाग रचना दि. १० आॅक्टोबरला प्रसिद्ध झाल्यानंतर बव्हंशी चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत अनेक नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार कुंपणावर आहेत. प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने, सत्ताधारी मनसेसह दोन्ही कॉँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण लागण्याच्या शक्यतेने पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. महापालिकेच्या कोअर कमिटीने प्रारूप प्रभाग रचना तयार केली असून सध्या प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील त्रिस्तरीय समितीकडे तपासणीसाठी आहे. त्यानंतर तो राज्य निवडणूक आयोगाला १२ सप्टेंबरला सादर केला जाणार असून ७ आॅक्टोबरला राखीव जागांसाठी सोडत निघाल्यानंतर दि. १० आॅक्टोबरला प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचवेळी प्रभागांमधील भौगोलिक स्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह विद्यमान नगरसेवक व इच्छुक उमेदवारांना प्रभाग रचनेची प्रतीक्षा लागून आहे. प्रभाग रचनेनंतर राजकीय पक्षांमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत अनेक नगरसेवक कुंपणावर असून प्रभाग रचनेपर्यंत त्यांची भूमिका ‘थांबा आणि प्रतीक्षा करा’ अशीच आहे. तोपर्यंत कोणत्या पक्षात उडी घ्यायची, आपला नेमका प्रतिस्पर्धी कोण असेल, कोणत्या भागात आपली ताकद राहील, याची चाचपणी इच्छुकांनी सुरू केली आहे. प्रभाग रचनेनंतर पक्षांतराला वेग येणार आहे. आतापर्यंत पक्षांतराची सर्वाधिक झळ सत्ताधारी मनसेला बसली आहे. मनसेच्या तब्बल १६ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. तर त्याखालोखाल राष्ट्रवादी आणि माकपच्या प्रत्येकी दोन नगरसेवकांचा समावेश आहे. दोन अपक्षांनीही भाजपाला जवळ केले आहे.