शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

‘माणुसकीची भिंत’ पोहोचली ग्रामीण भागात

By admin | Updated: January 9, 2017 01:15 IST

कळवण : गरजू विद्यार्थ्यांना कपड्यांसह शालेय साहित्याचे वाटप

कळवण : शहरासह इतर शहरी व ग्रामीण भागात सुरू झालेली ‘माणुसकीची भिंत’ हा लोकाभिमुख उपक्रम आता थेट शाळेपर्यंत पोहोचला आहे. शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध व्हावे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे हे साहित्य पडून आहे, त्याचा गरजू विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने मविप्रचे कळवण तालुका संचालक रवींद्र देवरे यांच्या प्रेरणेने बेज येथील महात्मा फुले विद्यालयाने हा उप्रकम सुरू करण्यात आला असून, त्याला विद्यार्थी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे.
गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक त्या शालेय वस्तू उपलब्ध व्हाव्यात आणि ज्यांच्याकडे या वस्तू अनेक दिवसांपासून पडून आहेत त्या वस्तूंचे दान करून सत्कर्म करता यावे, या उद्देशाने सुरू केलेला ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्र म सुरू केलेला आहे. विद्यार्थी आपल्याकडील स्वेटर, कपडे, मुलांचे कपडे यांसारख्या वापरातील मात्र अनेक दिवसांपासून घरात पडून असलेल्या सुस्थितीतील वस्तू या भिंतीसमोर आणून ठेवत आहेत. ज्यांना या गोष्टीची गरज आहे, तो ती वस्तू घेऊन जातो. हा स्तुत्य उपक्र म शाळेने सरू केला असून, विद्यालयातील शिक्षकांनी हा लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा निर्णय घेऊन गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. विद्यालयाच्या प्रांगणातील प्रवेशद्वार नजीकच्या भिंतीला माणुसकीची भिंत म्हणून नामकरण करण्यात आले असून, ही भिंत आकर्षक पद्धतीने रंगविण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना यातील ज्या साहित्याची आवश्यकता आहे ते विद्यार्थी त्या साहित्याची शिक्षकांकडे मागणी करतात. शिक्षक त्या साहित्याची विद्यार्थ्यांना वाटणी करत असून, एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना एकच साहित्य हवे असल्यास पुढील आठवड्यात तसे साहित्य उपलब्ध झाल्यावर देण्याबाबत सूचित केले जाते.
विद्यालयातील शिक्षकदेखील या उपक्रमात सहभागी होत असून, विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करून या टेबलावर ठेवतात, असे विद्यालयातील उपक्रमशील प्राचार्य रौंदळ यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत आपल्याकडील वापरात नसलेले कपडे ‘भिंत माणुसकीजवळ’ ठेवून जावे आणि तिथून ज्यांना या कपड्यांची खरोखरच आवश्यकता आहे त्यांनी ते घेऊन जावेत, असे आवाहन विद्यालयातील उपशिक्षक मीरा आहेर, नितीन पाटील, जय लाडे, गुरू गावित यांनी केले आहे. एच. पी. मोरे, जे. डी बागुल, एच. एस. आहेर डी. पी. जाधव, पी. एस. पवार, भुसारे, राज सरकार, दीपक कापडणीस, कैलास हिरे, वैभव सोनवणे, देशमुख, पवार, डगळे, बागुल, भोये, आहेर, जाधव, बच्छाव, निकम आदि परिश्रम घेत आहे. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे. एस. पवार यांच्या हस्ते व मविप्र संचालक रवींद्र देवरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. (वार्ताहर)