पांगरी येथून मानाचा रथ मºहळ कडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 17:46 IST2019-02-20T17:46:32+5:302019-02-20T17:46:44+5:30
पांगरी : प्रतिजेजुरी म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातल्या मºहळ येथील खंडेराव महाराज यात्रेस गुरवारपासून उत्साहात प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या भव्य मिरवणूकीने पांगरी येथील मानाची पालखी व रथ मºहळकडे रवाना करण्यात आला.

पांगरी येथून मानाचा रथ मºहळ कडे रवाना
पांगरी : प्रतिजेजुरी म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातल्या मºहळ येथील खंडेराव महाराज यात्रेस गुरवारपासून उत्साहात प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या भव्य मिरवणूकीने पांगरी येथील मानाची पालखी व रथ मºहळकडे रवाना करण्यात आला.
पांगरी गावास यात्रेचा मान असून, रथ येईपर्यंत कोणत्याही धार्मिक विधीस आरंभ होत नाही. आकर्षक रोषणाई केलेला रथ पांगरी येथून मºहळ येथे दिमाखात जातो. दरवर्षी एका कुळास त्याचा मान दिला जातो. त्यात पांगारकर, धाकटे पगार, थोरले पगार, निरगुडे- दळवी, पाथरवटसमाज व बारा बलुतेदार यांना हा मान आलटून पालटून दिला जातो. यावर्षी बारा बलुतेदार यांना मान असून विलास कलकत्ते यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली त्यानंतर गावातून (मंगळवारी) रथाची मिरवणूक काढून हा रथ येथून तीन किलोमीटर असलेले दर्पात नेण्यात आला. येथे पूजा व तळी भरण्यात आली. त्यानंतर रात्रभर येथे जागरण गोंधळचे आयोजन करण्यात आले होते. दुसरे दिवशी बुधवारी सायंकाळी परत रथाची गावातून मिरवणूक काढून रथ मºहळकडे रवाना झाला.