मनमाडला स्वच्छता जनजागृती फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 10:54 PM2018-11-16T22:54:58+5:302018-11-17T00:24:15+5:30

राज्य शासन निर्णयानुसार मनमाड नगर परिषदेच्या वतीने शहरातून फेरी काढून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.

Manmad's Cleanliness Public awareness round | मनमाडला स्वच्छता जनजागृती फेरी

मनमाड येथे जनजागृती फेरीमध्ये सहभागी झालेले पालिकेचे कर्मचारी.

Next

मनमाड : राज्य शासन निर्णयानुसार मनमाड नगर परिषदेच्या वतीने शहरातून फेरी काढून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.
पालिका अध्यक्ष पद्मावती धात्रक, मुख्य अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील कोर्ट भागातून स्वच्छता, कॅरिबॅग्ज, ओला कचरा, सुका कचऱ्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फेरी काढण्यात आली. ही फेरी मालेगाव रोड, रेल्वेस्थानक, शिवाजी चौक, सुभाष रोड, महालक्ष्मी चौकमार्गे निघाली. एकात्मता चौकात फेरीची सांगता करण्यात आली. या ठिकाणी सुधाकर मोरे, पद्मावती धात्रक, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, गंगाभाऊ त्रिभुवन यांनी सफाईबाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी राजेंद्र पाटील, संदीप तोरणे, दिनेश पठारे, प्रकाश दखने, सतीश बहोत, सूरज चावरिया, दिनेश करोसिया, संजय बहोत, संजय छजलाना, संतोष वानखडे, चद्रकांत भोसले, सागर आहिरे, संतोष जाधव, सुमेध आहिरे, आनंद औटी आदी उपस्थित होते.

Web Title: Manmad's Cleanliness Public awareness round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.