मनमाडला वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, चौघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:32 IST2020-03-20T23:46:18+5:302020-03-21T00:32:02+5:30
मनमाड येथील शिवाजीनगर भागात विवाह सोहळ्यात जुन्या वादाच्या कारणावरून झालेली हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या गजाबाई बारकू सोनवणे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाइकांनी केल्याने मनमाड पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनमाडला वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, चौघे ताब्यात
मनमाड : येथील शिवाजीनगर भागात विवाह सोहळ्यात जुन्या वादाच्या कारणावरून झालेली हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या गजाबाई बारकू सोनवणे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप नातेवाइकांनी केल्याने मनमाड पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रवीण रामदास सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. प्रवीण सोनवणे यांच्या चुलत बहिणीच्या हळदी कार्यक्र मानंतर रवि बर्डे व सागर पवार याने जुन्या वादातून शिवीगाळ करून प्रवीणला मारहाण केली. गजाबाई सोनवणे भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता धक्का लागून त्या खाली पडून मयत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित आरोपीविरुद्ध कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता.