मनमाडचे रस्ते बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 22:26 IST2020-04-07T22:25:58+5:302020-04-07T22:26:24+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व सध्याच्या परिस्थितीची पाहणी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांनी केली. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातून जाणारे मुख्य महामार्ग वगळता अन्य छोटे रस्ते बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

मनमाड येथे पाहणी प्रसंगी चर्चा करताना उपजिल्हाधिकारी डॉ अरविंद अंतुर्लीकर. समवेत मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर, समरसिंग साळवे आदी.
मनमाड : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व सध्याच्या परिस्थितीची पाहणी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांनी केली. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातून जाणारे मुख्य महामार्ग वगळता अन्य छोटे रस्ते बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
शहरात लॉकडाउन असताना जीवनावश्यक साहित्याच्या ठिकाणची गर्दी कमी करण्यासाठी तसेच जीवनावश्यक वस्तू नागरिकांपर्यंत सुरळीतपणे पोहोचविणे तसेच शहरात गर्दी होणार नाही याबाबत पालिकेचे सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत विविध गट तयार करून नियोजन करण्यात आले आहे. या सर्व गटांना डॉ. अंतुर्लीकर यांनी मार्गदर्शन केले. शहरातील नागरिकांनी प्रवास किंवा गर्दी करू नये म्हणून संपूर्ण मनमाड शहराचे मुख्य रस्ते सोडून सर्व गल्ली व इतर लहान रस्ते आठ दिवसांसाठी तात्पुरते बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत फॅशन डिझाइनचे कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी तयार केलेले मास्क शहरातील स्वच्छता कामगार कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, नगर रचना विभागाचे अझर शेख, संदीप आगोणे, सीमा वानखेडे, ज्योती डेव्हिड, मीर अहमद आदी उपस्थित होते.