मनमाडला बालकाचा दुर्दैवी मृत्यू
By Admin | Updated: September 14, 2016 00:43 IST2016-09-14T00:43:17+5:302016-09-14T00:43:31+5:30
मनमाडला बालकाचा दुर्दैवी मृत्यू

मनमाडला बालकाचा दुर्दैवी मृत्यू
मनमाड : येथील प्रोफेसर कॉलनी भागात १३ वर्षीय बालकाचा कंपाउंडच्या फाटकावरून पडल्याने लोखंडी गज शरीरात घुसून मृत्यू झाला. शिवाजीनगरमधील रहिवासी आदित्य भीमराव जाधव (१३) हा प्रोफेसर कॉलनीजवळील मैदानावर खेळण्यासाठी गेला होता. कंपाउंडच्या फाटकावर चढून पतंग उडवण्याच्या नादात हात निसटून तो खाली पडला. पडताना फाटकाचा लोखंडी गज त्याच्या शरीरात घुसल्याने तो जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात नेले असता तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मनमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)