मनमाडला भ्रमणध्वनी चोरट्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:12 IST2018-03-24T00:12:58+5:302018-03-24T00:12:58+5:30
मनमाड रेल्वेस्थानकात गोवा एक्स्प्रेसमधील प्रवाशाचा मोबाइल चोरून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडले.

मनमाडला भ्रमणध्वनी चोरट्याला अटक
मनमाड : मनमाड रेल्वेस्थानकात गोवा एक्स्प्रेसमधील प्रवाशाचा मोबाइल चोरून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडले. निजामुद्दीन - गोवा एक्स्प्रेसने नवशात खालीद लक्ष्मेश्वर (रा. कर्नाटक) प्रवास करत होते. गाडी मनमाड रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक चारवरून निघण्याच्या तयारीत असताना संशयित समीर रमजान चौधरी (रा. कुर्ला, मुंबई) याने नवशाद यांच्या हाताला झटका मारून मोबाइल खाली पाडला व मोबाइल उचलून पळ काढला. सदरचा प्रकार रेसुब कर्मचारी मनीषसिंंग यांच्या निदर्शनास आल्याने सहकाºयांसह चोरट्याचा पाठलाग करून पकडले. संशयित आरोपीने मोबाइल चोरीची कबुली दिली.