आंबा उत्पादक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:28 IST2019-02-10T21:19:44+5:302019-02-11T00:28:31+5:30
गेल्या हंगामात चांगली थंडी व पिकांना पोषक असे वातावरण असल्यामुळे सर्वच पिके चांगली आली आहेत. थंडी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण होत आहे. या थंडीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाने शेतीच्या बांधावर पडीत जागेवर आणि घरासमोर लावलेली आंब्याची झाडे हिरवीगार झाली असून, मोहराच्या फुलांनी बहरली असल्यामुळे शेतकरीवर्ग समाधानी झाला आहे.

आंबा उत्पादक संकटात
वटार : गेल्या हंगामात चांगली थंडी व पिकांना पोषक असे वातावरण असल्यामुळे सर्वच पिके चांगली आली आहेत. थंडी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण होत आहे. या थंडीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाने शेतीच्या बांधावर पडीत जागेवर आणि घरासमोर लावलेली आंब्याची झाडे हिरवीगार झाली असून, मोहराच्या फुलांनी बहरली असल्यामुळे शेतकरीवर्ग समाधानी झाला आहे.
बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात गावरान जातीची मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे आहेत. त्यात गोट्या, सेंद्र्या, काळ्या, ढवळ्या, दोडी आदी अशी आंब्याची नावे आहेत. तर काही शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीच्या नवीन केसरसारखी आंब्याच्या जाती लावल्या आहेत. थंडीमुळे आंब्याने मोठ्या प्रमाणावर आम्रमोहर बहरल्याचे चित्र दिसत आहे.
आंब्यांना पिवळे-केशरी सोन्याच्या अलंकाराप्रमाणे आम्रमोहर बहरल्याने शेतकºयांना चांगल्या उत्पन्नाची आशा बळावली आहे. परिसरात आंबा मोहराच्या सुगंधाने भरून गेला आहे. प्रचंड मोहर आल्याने उच्चांकी पिकाची अपेक्षा आहे; मात्र त्यासाठी निसर्गाची साथ अपेक्षित असून, येत्या पंधरवड्यात थंडीने चंबूगबाळे आवरले तरच मोहराचे चांगले फळ चाखण्यास मिळेल.
गेली चार वर्षं लहरी निसर्गाचा फटका बसल्यामुळे सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर राहिलेला आंबा यंदा सर्वांचे तोंड मनसोक्तपणे गोड करण्याची चिन्हे आहेत. दिवसभर वारगी चालू असल्यामुळे मोहोर झटकला जात आहे. आंब्याला फुलोºयावर आलेला मोहर कुजून गेला असून, असा मोहर काळा पडत असल्याने आंब्याचा भार गळून पडला आहे, त्यामुळे आंबा उत्पादन घटण्याचा अंदाज शेतकºयांकडून व्यक्त केला जात आहे.
वातावरणामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव
वातावरणात अचानक बदल झाला असून, दिवसभर थंडगार वारे निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. सर्दी, पडसे, खोकला यांसारखे आजार उद्भवू लागले आहेत, त्यामुळे परिसरातील दवाखान्यांमध्ये
रुग्णांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे.
४गेल्या चार-पाच वर्षांपासून हवामानात सातत्याने बदल जाणवत असल्याने साहजिकच याचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. कारण या ढगाळ वातावरणामुळे आंब्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.