शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

मनपाची ईआरपी प्रणाली ठप्प

By admin | Updated: August 26, 2016 23:32 IST

कामकाजावर परिणाम : फाईलींचा प्रवास थांबला

नाशिक : महापालिकेची ईआरपी (एंटरप्राईजेस रिसोर्स प्लॅनिंग) संगणकीय प्रणाली गेल्या १० ते १५ दिवसांपासून बंद पडल्याने फाईलींचा प्रवास लांबला आहे. त्यातच गेल्या चार-पाच दिवसांपासून सर्व्हर डाउन झाल्याने कामकाजही ठप्प झाले आहे. दरम्यान, संगणक विभागाकडे पुरेसे कुशल व प्रशिक्षणार्थी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने दुरस्ती कामास विलंब होत असल्याचे कारण दिले जात आहे. आयुक्त संजय खंदारे असताना महापालिकेत ईआरपी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. परंतु संगणक हाताळणीत कुशल कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे सदर प्रणाली आत्मसात करण्यास बराच विलंब गेला. खंदारे यांच्यानंतर डॉ. प्रवीण गेडाम हे आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर मागील वर्षी महापालिकेचे सन २०१५-१६ चे अंदाजपत्रक त्यांनी ईआरपी प्रणालीनुसारच तयार करत सादर केले होते. या प्रणालीमुळे उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार असल्याचा दावा त्यावेळी गेडाम यांनी केला होता. ईआरपी संगणकीय प्रणालीअंतर्गत महापालिकेच्या मुख्यालयासह सहा विभागात विविध पे सेंटरकरिता सांकेतांक संगणक कोड देण्यात आलेले आहेत. यापूर्वी सर्व कॉस्ट सेंटरसाठी एकच संगणक कोड ग्राह्य धरून अंदाजपत्रकात आकडेवारी नमूद करण्यात येत होती. परंतु नवीन ईआरपी प्रणालीनुसार प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र कॉस्ट सेंटर दर्शविण्यात येऊन त्यातून मिळणारा महसूल व त्यावर होणारा विविध बाबींवर खर्चदेखील स्वतंत्रपणे दर्शविण्यात येऊ लागला. त्याचप्रमाणे एका लेखाशीर्षातील रक्कम दुसऱ्या लेखाशीर्षातदेखील आयुक्तांच्या सहमतीने देण्याची व्यवस्था प्रणालीत आहे. (प्रतिनिधी)