शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

मंदा निकम सभापती, उपसभापतिपदी ढिकले

By admin | Updated: September 16, 2014 23:55 IST

मंदा निकम सभापती, उपसभापतिपदी ढिकले

 

नाशिक : पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत सभापतिपदाची निवडणूक वगळता उपसभापतिपदासाठी अखेरपर्यंत चुरस निर्माण होऊन मावळते सभापती अनिल ढिकले यांची उपसभापतिपदी निवड झाली.नाशिक पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण इतर मागास प्रवर्ग (महिला) राखीव असल्याने आणि या संवर्गातून राष्ट्रवादीकडून मंदाबाई सुखदेव निकम या एकमेव सदस्य निवडून आलेल्या असल्याने त्यांची निवड अपेक्षित मानली जात होती. पंचायत समितीच्या कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीत पीठासन अधिकारी तथा तहसीलदार गणेश राठोड व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी रवींद्रसिंह परदेशी यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. सुरुवातीलाच सदस्य मंदाबाई निकम या पती सुखदेव निकम व सदस्य धनाजी पाटील तसेच राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष तानाजी गायधनी यांच्याबरोबर सभागृहालगतच्या इमारतीत बसल्या होत्या. पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर बरोबर दुपारी बारा वाजता राखाडी रंगाच्या फॉर्च्युनर वाहनातून (एमएच १५ - १४७०) शिवसेनेच्या महिला पदाधिकारी शोभा गटकळ तसेच मावळते सभापती अनिल ढिकले, मनसेच्या सदस्य शोभा लोहकरे व सुशीला वाघेले पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराजवळ येताच राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या सदस्यांनी हे वाहन रोखण्याचा प्रयत्न केला. वाहनात कॉँग्रेसचे सदस्य प्रकाश बदादे असल्याचे सांगत बदादे यांच्या पत्नी व मुलगा संजय बदादे यांनी वाहनासमोर आडवे येण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला. मात्र राष्ट्रवादी व कॉँग्रेसचे कार्यकर्ते वाहन पुढे जाऊ देण्यास तयार नव्हते. त्याचवेळी सेनेचा फौजफाटा तेथे पोहोचला. जगन आगळे, बंटी तिदमे, दिलीप चव्हाण, संजय तुंगार यांनी हे वाहन सभागृहापर्यंत सोडण्यासाठी रेटा लावला. त्याचवेळी सेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून सौम्य लाठीमार करत संजय बदादे याला ताब्यात घेतले. त्यानंतर बरोबर १ वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे गणेश राठोड यांनी सांगितले. सभापतिपदासाठी मंदाबाई निकम यांचा एकमेव, तर उपसभापति-पदासाठी राष्ट्रवादीचे धनाजी पाटील व कॉँग्रेसचे अनिल ढिकले यांचा असे दोन अर्ज प्राप्त झाले. छाननीत दोन्ही अर्ज वैध असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले. त्यानंतर १.१५ ते १.३० दरम्यान अर्ज माघारीच्या वेळेत धनाजी पाटील यांनी अर्ज माघार घेतला.अर्ज माघारीनंतर धनाजी पाटील व मनसे पुरस्कृत अपक्ष कैलास चव्हाण यांनी तडक सभागृह सोडले. त्यानंतर सभापती व उपसभापतिपदासाठी एकेक अर्ज प्राप्त झाल्याने सभापतिपदी मंदाबाई निकम, तर उपसभापतिपदी अनिल ढिकले यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा गणेश राठोड यांनी केली. निवड झाल्यानंतर पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनिल ढिकले यांना उचलून घेत घोषणाबाजी केली. (प्रतिनिधी)