शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मनमाडकरांना पालखेडच्या पाण्याच्या आवर्तनाची ‘प्रतीक्षा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:34 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाण्याची तहान भागविण्यासाठी मनमाडकरांना आता पालखेडच्या पाण्याची रोटेशनची प्रतीक्षा असून, प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी,

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातीलपाणीसाठा संपुष्टात आल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाण्याची तहान भागविण्यासाठी मनमाडकरांना आता पालखेडच्या पाण्याची रोटेशनची प्रतीक्षा असून, प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.तीव्र पाणीटंचाईमध्ये पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळील मुख्य जलकुंभाच्या पाइपमधून होणाºया गळतीमुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत असताना पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाणीटंचाई पाचवीला पूजलेल्या मनमाड शहरात पाण्याअभावी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा शहर व परिसरात दमदार पाऊस न झाल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली असून, नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यावर्षी वरुणराजा परिसरावर रुसलेलाच राहिला. शहराला पाणीपुरवठा करणाºया वागदर्डी धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने यावर्षी धरणात पाणी आलेच नाही. संपूर्ण वर्षभर मनमाडकरांची तहान पालखेडच्या रोटेशनने भागविली. दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांच्या खासगी विंधनविहिरींनी केव्हाच राम म्हटले आहे.पाण्याच्या उपलब्धतेअभावी पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये वाढ होत जाऊन तो कालावधी आज २३ दिवसांच्या वर जाऊन पोहोचलाआहे. सध्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने पुढील उपाययोजनान केल्यास पाण्यासाठी हतबल होण्याची वेळ मनमाडकरांवर ओढावणार आहे. या परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींसह पालिका प्रशासनसुद्धा गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.पालखेडच्या रोटेशन मिळण्यास विलंब झाल्यास शहरावर मोठे जलसंकट ओढावणार आहे. पालखेडचे रोटेशन लवकरात  लवकर सोडण्यात यावे यासाठी पालिका प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.जलकुंभाच्या पाइपमधून पाण्याची गळतीमनमाड शहरात पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. महिला वर्ग हंडाभर पाण्यासाठी दारोदार फिरत असल्याचे चित्र पहावयास मिळते. इतकी भीषण परिस्थिती असताना वागदर्डी धरणालगत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात उभारण्यात आलेल्या जलकुंभाच्या पाइपमधून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. या जलकुंभातून शहरातील जलकुंभांना पाणीपुरवठा करण्यात येत असतो. तसेच जलशुद्धीकरण केंद्राला खेटून असलेल्या व्हॉल्व्हमधून पण मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने पाणी वाया जाते. भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याच्या होणाºया अपव्ययाबाबत पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीDamधरण