खताची भरलेली मालट्रक उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 20:37 IST2021-09-02T20:31:40+5:302021-09-02T20:37:06+5:30
चांदवड : चांदवड मनमाड रस्त्यावर खताची भरलेली मालट्रक (एम एच १८/बी ए/४४२) ही मनमाड बाजूकडून चांदवड बाजूकडे जात असताना गुरुवारी पहाटे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास उलटली.

खताची भरलेली मालट्रक उलटली
ठळक मुद्दे जुन्या मोरीचे पाईप हे अंधारात दिसले नसल्यामुळे गाडी उलटली
चांदवड : चांदवड मनमाड रस्त्यावर खताची भरलेली मालट्रक (एम एच १८/बी ए/४४२) ही मनमाड बाजूकडून चांदवड बाजूकडे जात असताना गुरुवारी पहाटे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास उलटली.
दुगावजवळ रानमळा या ठिकाणी रस्त्याचे काम चालू असलेल्या ठिकाणी साईडला काढून ठेवलेले जुन्या मोरीचे पाईप हे अंधारात दिसले नसल्यामुळे गाडी उलटली; मात्र या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नाही, तर चांदवड पोलीस ठाण्याला कुठलीही नोंद नाही.