मालेगावी शिक्षकभारतीचा मेळावा

By Admin | Updated: January 19, 2016 23:54 IST2016-01-19T23:52:58+5:302016-01-19T23:54:01+5:30

मालेगावी शिक्षकभारतीचा मेळावा

Malegaon teacher's rally | मालेगावी शिक्षकभारतीचा मेळावा

मालेगावी शिक्षकभारतीचा मेळावा

वडेल : राज्यातील कर्मचाऱ्यांना १९८२च्या कायद्यानुसार जुनी पेन्शन मिळणे हा त्यांचा हक्क आहे व तो हक्क नोव्हेंबर २००५नंतरच्या शिक्षकांसह सर्वच कर्मचाऱ्यांना मिळाल्याशिवाय शिक्षकभारती स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी केले.
मालेगाव येथे प्राथमिक शिक्षकभारतीच्या वतीने आयोजित जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, पंचायत समिती सभापती भरत पवार, राज्याध्यक्ष नवनाथ गेंड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षकभारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे होते.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र लोंढे, राजेंद्र शेलार, एस.के.सावंत,
बाळासाहेब डांगळे, प्रशांत
पवार, सुनील फरस, श्यामकांत चव्हाण, के. पी. पवार, जितेंद्र खैरनार, अजित लाठर, विजय पगार, प्रशांत पाटील, सुनील निकम, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष कांबळे, सरचिटणीस मच्छिंद्र तेली, विष्णू गुमाडे, ज्ञानेश्वर चाफेकानडे, हेमंत सोनवणे, वाल्मीक घरटे, प्रकाश बच्छाव, लता वाघ, प्रतिभा बागडे आदिंनी शिक्षकभारती संघटनेत प्रवेश केला. प्रास्ताविक राज्य सरचिटणीस भरत शेलार यांनी केले.

Web Title: Malegaon teacher's rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.