मालेगावी पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 17:09 IST2020-04-11T17:08:29+5:302020-04-11T17:09:57+5:30

येथे पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांचे रिडर पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हाल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली. शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास नियंत्रण कक्षातील महिला समुपदेशन केंद्रासमोरील झाडाखाली घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

 Malegaon police sub-inspector shot dead | मालेगावी पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्त्या

मालेगावी पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्त्या

मालेगाव : येथे पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांचे रिडर पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हाल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली. शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास नियंत्रण कक्षातील महिला समुपदेशन केंद्रासमोरील झाडाखाली घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
विशेष म्हणजे घटना घडली त्यावेळी नियंत्रण कक्षातील सुसंवाद कक्षात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक सुरू होती. सदर बैठक संपल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना अजहर शेख हे झाडाखाली रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले.

Web Title:  Malegaon police sub-inspector shot dead