मालेगाव : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांचे हाल जुन्या आग्रारोडवर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:30 PM2017-12-10T23:30:29+5:302017-12-10T23:45:59+5:30

मालेगाव शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, संबंधितांनी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Malegaon: Due to road disruption due to road mileage, potholes on old agaroad | मालेगाव : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांचे हाल जुन्या आग्रारोडवर खड्डेच खड्डे

मालेगाव : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांचे हाल जुन्या आग्रारोडवर खड्डेच खड्डे

Next

मालेगाव कॅम्प : मालेगाव शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असून, संबंधितांनी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांचे हाल होत असून, रस्त्यावर लहान-मोठे खड्डे असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जुन्या आग्रारोडवर काही ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शहरातील पश्चिम भागातील जुना आग्रारोड, सटाणारोड, कॅम्प रस्ता येथे अनेक ठिकाणी रस्ते उखडून खडी बाहेर आली आहे. जुन्या आग्रारोडवरील छाजेड ट्रान्सपोर्टसमोर लगत असलेल्या रस्त्यांवरील पूर्णपणे खडी उखडून दगड बाहेर आले आहे.
रस्त्यावर मोठ्या आकाराचा पसरट खड्डा पडला आहे. या ठिकाणी रस्त्यावर जमिनीखालून गेलेल्या नळ जोडण्यांना अनेक दिवसांपासून गळती लागली आहे तर ऐन पाणी येण्याच्या वेळेत वाहिनीतून दाब वाढल्यावर पाइपामधून पाणी सरळ रस्त्यावर खड्ड्यात साचत आहे. ही गळती अनेक महिन्यांपासून होत आहे परंतु जुजबी दुरुस्ती व वेळकाढूपणा मनपाकडून केला जात आहे. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होते व वेळोवेळी खर्च वाया जात आहे. या रस्त्यावर मोसमपुलापासून गिरणा पुलापर्यंत असेच लहान-मोठे खड्डे झाले असल्याने वाहनचालकांना डोकेदुखी ठरत आहे. सटाणारोडवरदेखील अनेक ठिकाणी खड्डे झाले आहे. येथून स्टेट बॅँककडे जाणारा वळण रस्ता, साठफुटी वळण रस्ता, जाजू हॉस्पिटल समोरील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे झाले आहे. येथे रस्ता खोदून खासगी नळ जोडण्यांमुळे रस्त्यांवर आडव्या चाºया खोदलेल्या आहे. त्या व्यवस्थित बुजविण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे या रस्त्यावर अनेकदा लहान-मोठे अपघात होतात व वाहनांचे नुकसान व वादाचे प्रसंग निर्माण होतात. येथेही जुजबी दुरुस्ती व खर्च होत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण झाले असले तरी रस्ता अजिबातच सुस्थितीत नसल्याने पादचारी, लहान मोठ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Malegaon: Due to road disruption due to road mileage, potholes on old agaroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात