मालेगावचा व्यापारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 01:16 IST2018-12-04T01:15:43+5:302018-12-04T01:16:06+5:30

सटाणा : ताहाराबाद रस्त्यावरील वीरगावनजीक होंडा सिटी कारच्या चालकाचा ताबा सुटून कार झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात मालेगाव येथील व्यापारी संजय रमणभाई आमीन (५०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती सटाणा पोलिसांनी दिली आहे.

Malegaon businessman killed | मालेगावचा व्यापारी ठार

मालेगावचा व्यापारी ठार

ठळक मुद्देतिघे जखमी : वाहनावरील ताबा सुटला वीरगावजवळ अपघात;

सटाणा : ताहाराबाद रस्त्यावरील वीरगावनजीक होंडा सिटी कारच्या चालकाचा ताबा सुटून कार झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात मालेगाव येथील व्यापारी संजय रमणभाई आमीन (५०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालकासह तिघे किरकोळ जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती सटाणा पोलिसांनी दिली आहे.
मालेगाव येथे वास्तव्यास असलेले मूळचे गुजरात राज्यातील आमीन कुटुंबीय गुजरातमधील एका नातलगाच्या साखरपुड्याच्या कार्यक्र माला गेले होते. गुजरातहून परतीच्या प्रवासाला निघालेल्या त्यांच्या होंडा सिटी कार चालकाला पहाटेच्या सुमारास डुलकी आल्याने वीरगाव परिसरात ही कार झाडावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की या अपघातात कारमध्ये बसलेले संजय आमीन यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा ध्रुव आमीन (१५) आणि वडील रमनभाई अमीन (७०), चालक पार्थ आमीन हे किरकोळ जखमी झाले आहेत. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.चालक पार्थची होती परीक्षा
च्कारचालक पार्थ अमीन यांची मालेगाव येथील एका महाविद्यालयात सोमवारी (दि.३) परीक्षा होती. ताहाराबाद परिसरातदेखील त्यांना डुलकी आल्याने कारचा ताबा सुटला होता; मात्र तो वेळीच नियंत्रणात आला. संजय आमीन यांनी त्याला तासभर आराम करण्याचा सल्लादेखील दिला होता. मात्र परीक्षा आहे म्हणून लवकर मालेगावला जायचे आहे यासाठी त्याने आराम न करता कार चालविल्याने पुन्हा त्याला डुलकी आली आणि कार झाडावर आदळून आमीन यांचा मृत्यू झाल्याचे त्यांचे पुत्र ध्रुव याने ही माहिती पोलिसांना दिली.

Web Title: Malegaon businessman killed

टॅग्स :Accidentअपघात