मालेगावी श्रीगणेशोत्सव आरास तयारीस प्रारंभ

By Admin | Updated: July 30, 2014 00:21 IST2014-07-30T00:14:20+5:302014-07-30T00:21:45+5:30

मालेगावी श्रीगणेशोत्सव आरास तयारीस प्रारंभ

Malegaavi Shree Ganeshotsav Aaras Preparation Start | मालेगावी श्रीगणेशोत्सव आरास तयारीस प्रारंभ

मालेगावी श्रीगणेशोत्सव आरास तयारीस प्रारंभ

मालेगाव : श्रीगणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपले असताना शहरातील श्रीगणेश मंडळे या उत्सवाच्या तयारीला लागले आहेत. सोयगाव पाटीलवाडी भागातील बालाजी प्रतिष्ठानतर्फे शुभदा शाळेलगत बालाजी चौकात यंदा प्रति बालाजी मंदिराची ३५ फूटी उंचीची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. या मंदिरात श्रीबालाजीच्या रूपातील गणेशमूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. इंदौर व पुणे येथील कारागीर ही प्रतिकृती साकारणार आहेत. या आरास प्रदर्शन कामाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. सदर आरास श्रीगणेश उत्सवाच्या संपूर्ण दहा दिवस पहाटे सहा ते नऊ व सायंकाळी पाच ते दहा यावेळेत भाविकांसाठी खुली राहणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष समीर पाटील यांनी दिली. सदर आरास भूमिपूजनप्रसंगी मनोहर बच्छाव, नीलेश अहेर, बाबा पाटील, सचिन बच्छाव, क्रांती पाटील,
बापू शिंदे, जितू पाटील यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Web Title: Malegaavi Shree Ganeshotsav Aaras Preparation Start