मालेगावी तलावात बुडून मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 22:54 IST2020-04-06T22:54:21+5:302020-04-06T22:54:56+5:30
मालेगाव : शहरातील दरेगाव भागात असलेल्या गायदरा पाझर तलावात बुडून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

मालेगावी तलावात बुडून मुलाचा मृत्यू
मालेगाव : शहरातील दरेगाव भागात असलेल्या गायदरा पाझर तलावात बुडून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. शहरातील जमहूर हायस्कुल परिसरातील अयुबनगर भागात राहणारी चार लहान मुले दरेगाव शिवारातील गायदरा तलावात पोहण्यासाठी गेले होते. सध्या कोरोनामुळे जमावबंदी असतानाही ते कुटुंबियांची नजर चुकवून गायदरा तलावात अंघोळीसाठी गेले. परंतु सोहेल शेख (१२) हा मुलगा पोहता येत नसल्याने पाण्यात बुडाला .त्यावेळी झालेली आरडाओरड ऐकून लोक जमा झाले तोपर्यंत सोहेलचा मृत्यू झाला होता. अग्नीशमन दलाच्या जवानांनी मृतदेह तलावातून बाहेर काढला.