शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भिक लागली काय, मी तुला फुक्कट पोसणार काय ? शशांकने मागितले होते 2 कोटी 
2
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
3
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
4
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
5
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
6
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
7
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
8
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
9
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
10
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
11
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
12
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
13
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
14
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
15
धक्कादायक! चक्क ग्रामपंचायत कार्यालयच २० लाख रुपयांना ठेवलं गहाण, सरपंच बरखास्त, एफआयआर दाखल 
16
अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'
17
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
18
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
19
'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
20
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!

मॉडेल पोलीस अधिकारी बनून जनतेची सेवा करा : दत्ता पडसलगीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 16:31 IST

नाशिक : दहशतवादाचा सामना करण्याबरोबरच पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदारास चांगली वागणूक द्या, सामाजिक बांधिलकी, स्वच्छ कारभार याबरोबरच कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून मॉडेल पोलीस अधिकारी बनून जनतेची सेवा करा असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी केले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मुख्य कवायत मैदानावर मंगळवारी (दि़ ८) झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११६ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी पुणे जिल्ह्यातील चैताली गपाट यांचा स्वोर्ड आॅफ आॅनर (मानाची तलवार), अमितकुमार करपे (सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी) यांच्यासह पुरस्कारप्राप्त प्रशिक्षणार्थींचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला़

ठळक मुद्देमहाराष्ट्र पोलीस अकादमी दीक्षान्त समारंभ : पोलीस उपनिरीक्षक ११६ वी तुकडीपुण्याची चैताली गपाटे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ; उस्मानाबादचे करपे द्वितीय

नाशिक : दहशतवादाचा सामना करण्याबरोबरच पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदारास चांगली वागणूक द्या, सामाजिक बांधिलकी, स्वच्छ कारभार याबरोबरच कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून मॉडेल पोलीस अधिकारी बनून जनतेची सेवा करा असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी केले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मुख्य कवायत मैदानावर मंगळवारी (दि़ ८) झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११६ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी पुणे जिल्ह्यातील चैताली गपाट यांचा स्वोर्ड आॅफ आॅनर (मानाची तलवार), अमितकुमार करपे (सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी) यांच्यासह पुरस्कारप्राप्त प्रशिक्षणार्थींचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला़

पडसलगीकर पुढे म्हणाले की, पोलीस उपनिरीक्षक हे महत्वाचे पद असून बदली कोठेही झाली तरी या ठिकाणी मिळालेले प्रशिक्षण कायमच तुमच्यासोबत असेल़ या प्रशिक्षणाचा उपयोग भविष्यातील आंदोलनांची हाताळणी तसेच गुन्ह्यांच्या तपासासाठी उपयोगात येणार आहे़ या तुकडीत खातेअंतर्गत परीक्षा पास झालेले १४५ पुरूष व ७ महिला तसेच सागरी सुरक्षा तटरक्षक दलातील २३ असे १७५ अधिकाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़ महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किलोमीटर लांबीच्या सागरी सुरक्षा महत्वाची असून किनारपट्टीवरील शहरांच्या सुरक्षिततेसाठी लक्ष ठेवणे, समुद्रमागार्ने येणारे धोके निकामी करण्याचे काम तुम्हाला करावे लागणार आहे़ पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतर घेतलेली शपथ कायम स्मरणात ठेवा असे पडसलगीकर यांनी सांगितले़

यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी सादर शानदार संचलन केले़ प्रारंभी अकादमीच्या संचालक अश्वती दोरजे यांनी प्रशिक्षणार्थींना शपथ दिली. तसेच महाराष्ट्र पोलीस अकादमी ही देशपातळीवरील अग्रगण्य संस्था असल्याचे सांगितले़ यावेळी व्यासपीठावर अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय सक्सेना, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे आदींसह पोलीस अधिकारी उपस्थित होते़ सीमा पेठकर यांनी सूत्रसंचालन केले.पोलीस खात्यातील उच्च पदाचे स्वप्न

मध्यमवर्गीय कुटुंबातील असून २०१० मध्ये पुणे येथे पोलीस शिपाई म्हणून भरती झाले़ २०१६ मध्ये पोलीस खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले़ पोलीस खात्यात येण्यापुर्वी १२ वी सायन्स झालेले होते़ त्यानंतर बीएस्सी, बीए, एलएल़बी व आता एलएलएम करते आहे़ ९ एप्रिल २०१८ रोजी प्रशिक्षण सुरू झाले असून ९ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून महिला कुठेही कमी नाहीत हे सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थीचा पुरस्कार मिळवून दाखवून दिले आहे़ घरी एकत्रित कुटुंब असून शिक्षण तसेच पोलीस अधिकारी होण्यासाठी पतीने खूप प्रोत्साहन दिले़- चैताली गपाट, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी़ तिसरी पिढी पोलीस खात्यात

उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूरजवळील नळदुर्ग हे आमचे मूळ गाव असून आमची ही तिसरी पोलीस दलात आहे़ आजोबा पोलीस हवालदार होते़ वडील सहायक पोलीस उपनिरीक्षक तर मी पोलीस उपनिरीक्षक झालो़ २००८ मध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झालो़ २०१६ मध्ये खातेअंतर्गत परीक्षा पास झाल्यानंतर ९ एप्रिलपासून २०१८ पासून प्रशिक्षण सुरू झाले़ पोलीस उपनिरीक्षकपदाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता जनतेची सेवा करावयाची आहे़- अमितकुमार करपे, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी-द्वितीय़ ‘अ‍ॅम्बीस’ प्रशिक्षण दिलेली पहिलीच तुकडीमहाराष्ट्र पोलीस अकादमीतर्फे अ‍ॅम्बीस अर्थात ठसेतज्ज्ञ प्रणालीचे शिक्षण देण्यात आलेली ही पहिलीच तुकडी आहे़ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीच्या हात व पायाचे ठसे स्कॅन केल्यानंतर संबंधित व्यक्तीवर किती गुन्हे दाखल आहेत याची माहिती कशी मिळवायची याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आलेली ही पहिलीच तुकडी आहे़ या प्रशिक्षणाचा फायदा या अधिकाºयांना प्रत्यक्ष कामकाजाच्या ठिकाणी होणार आहे़निमंत्रितांची पाठमहाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दीक्षान्त सोहळ्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी बहारदार संचलन केले़ मात्र, या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित असलेले पालकमंत्री, खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना निमंत्रण देऊनही त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने विशेष निमंत्रितांचा मंडप रिकामा होता़ या कार्यक्रमास मंत्रीमहोदय उपस्थित नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे टाळल्याची चर्चा आहे़पुरस्कारप्राप्त प्रशिक्षणार्थी

* चैताली गपाट (पुणे) - स्वॉर्ड आॅफ आॅनर, स्व़ यशवंतराव चव्हाण सुवर्णकप सर्वोत्कृष्ट सर्वांगीण प्रशिक्षणार्थी, अहिल्याबाई होळकर ट्रॉफी सर्वोत्कृष्ट सर्वांगीण महिला प्रशिक्षणार्थी,सर्वोत्कृ ष्ट प्रशिक्षणार्थी अभ्यास (सिल्व्हर बॅटन), सावित्रीबाई फुले ट्रॉफी सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी आंतरवर्ग प्रशिक्षण, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी आधुनिक तंत्रज्ञान आणि बेकायदेशीर जमाव हाताळणे, डॉ़ बी़आऱ आंबेडकर ट्रॉफी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी कायदा* अमितकुमार करपे (उस्मानाबाद) - सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी द्वितीय* अजयकुमार राठोड - सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी फिजिकल ट्रेनिंग, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी परेड, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी उत्कृष्ट गणवेश* विनोद शेंडकर - सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी गुन्हेगारी शास्त्र व पिनालॉजी* सचिन सानप - एऩएम़ कामटे ट्रॉफी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी रिवॉल्व्हर फायरिंग* विजय राऊत - सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी खेळाडू* योगेश कातुरे - एस़जी़ इथापे पारितोषिक सर्वोत्कृष्ट वागणूक / वर्तणूक* रामजीलाल दूर्जनलाल पटले : सागरी पोलीस उपनिरीक्षक - आंतरवर्ग-बाह्यवर्ग या विषयामध्ये सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी* राजश्री पाटील - सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी कल्चरल अ‍ॅक्टिविटी 

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक