सायगाव : येथे कृषी विभाग व कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यामानाने कृषी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने मका पिक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. निफाड येथील कृषी शास्त्रज्ञ संशोधन केंद्राचे वाडीले यांनी, मक्यावरील लष्करी अळी बाबत मार्गदर्शन केले. कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेबाबत नाशिक जिल्हा युवती संघटक कु. स्नेहल मोरे यांनी माहिती दिली. यावेळी वृक्षरोपणही करण्यात आले. कार्यक्र मास सरपंच दिनेश खैरनार, उपसरपंच भानुदास उशीर, निवृत्त कृषी अधिकारी अशोक कुळधर, मंडळ कृषी अधिकारी सिद्दीकी, कृषी अधिकारी बिरारे, कृषी पर्यवेक्षक गिरासे, कृषी सहाय्यक विजय कापसे, ग्रामसेवक बोडके, पंचायत समतिीचे माजी सभापती अ?ॅड. आर. डी. खैरनार, भागुनाथ उशीर, गणपत खैरनार आदी उपस्थित होते.
सायगाव येथे मका पिक मार्गदर्शन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 19:00 IST
सायगाव : येथे कृषी विभाग व कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यामानाने कृषी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने मका पिक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.
सायगाव येथे मका पिक मार्गदर्शन कार्यशाळा
ठळक मुद्देयावेळी वृक्षरोपणही करण्यात आले