Mahesh Navami Mahotsav Image Worship at Home: Adherence to Distance Rules; The victory flag was hoisted | महेश नवमी महोत्सव घरोघरी साजरा प्रतिमापूजन : डिस्टन्स नियमांचे पालन; विजयध्वज फडकवला

महेश नवमी महोत्सव घरोघरी साजरा प्रतिमापूजन : डिस्टन्स नियमांचे पालन; विजयध्वज फडकवला

नासिकरोड : आर्टिलरी सेंटररोड येथील महेश भवन व माहेश्वरी समाजबांधवांनी घराघरात मोठ्या भक्तिभावाने महेश नवमी महोत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष उपस्थित न राहता आॅनलाइन माध्यमातून अनोख्यापद्धतीने रविवारी सदर उत्सव साजरा करण्यात आला.
माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस म्हणजे महेश नवमी महोत्सव साजरा केला जातो. माहेश्वरी समाज प्रत्येक परिवाराने आपापल्या घरी रांगोळी काढून, पणत्या लावत आकर्षक सजावट करून भगवंताचे पूजन केले. आर्टिलरी सेंटररोड महेश भवनमध्ये माहेश्वरी समाजाच्या मंडळांचे अध्यक्ष, सचिव व मोजक्याच प्रतिनिधींनी फिजिकल डिस्टन्स सांभाळून तोंडाला मास्क विजयध्वज फडकवून महेश भगवानच्या प्रतिमेचे पूजन केले.
लॉकडाउन काळामध्ये गरजूंना रोज दुपारी चपाती-भाजी, ताक वाटप, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर वाटप, समाजबांधवांना रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास श्रीनिवास लोया, अशोक तापिडया, अंकुश सोमाणी, सुरेखा सोमाणी, कविता राठी, रामेश्वर मालाणी, राधेश्याम बूब, सुनील बूब, अनिल मालपाणी, रामेश्वर जाजू, महेश बूब, अमर मालपाणी, आशिष कलंत्री, कल्पेश लोया, दिनेश करवा, मुकेश चांडक, मयूर करवा, अच्युत राठी आदी उपस्थित होते.

Web Title: Mahesh Navami Mahotsav Image Worship at Home: Adherence to Distance Rules; The victory flag was hoisted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.