शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Maharashtra Election 2019 : राजकीय महाकुंभात उतरली घराणेशाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 4:32 AM

राजकारणात घराणेशाही किती खोलवर रुजलेली आहे, याचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने येत आहे.

- धनंजय वाखारेनाशिक : राजकारणात घराणेशाही किती खोलवर रुजलेली आहे, याचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने येत आहे. जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांपैकी एकमेव मालेगाव बाह्य मतदारसंघवगळता अन्य १४ मतदारसंघांत आजी-माजी आमदारांच्या कन्या-सुपुत्र आणि नातेवाईकांनाच निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे.नांदगाव मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री व येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना राष्टÑवादीने तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित केली आहे. चांदवड मतदारसंघात माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे सुपुत्र व विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांना भाजपने दुसऱ्यांचा उमेदवारी दिली आहे. दिंडोरी मतदारसंघात जनता दलाचे माजी खासदार हरिभाऊ महाले यांचे सुपुत्र धनराज महाले यांना शिवसेनेने पुन्हा एकदा रिंगणात उतरविले आहे. देवळाली मतदारसंघात माजी मंत्री बबनराव घोलप यांचे सुपुत्र व विद्यमान आमदार योगेश घोलप यांच्यावर शिवसेनेने दुसºयांदा विश्वास टाकला आहे. याच मतदारसंघात माजी आमदार बाबुलाल अहिरे यांच्या कन्या व भाजपच्या नगरसेविका सरोज अहिरे यांनी बंडखोरी करत राष्टÑवादीकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे.नाशिक पश्चिममधून माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे सुपुत्र व माजी आमदार अपूर्व हिरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कळवण मतदारसंघात माजी मंत्री ए. टी. पवार यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार यांना राष्टÑवादीने उमेदवारी बहाल केली आहे. इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेसमधून बंडखोरी करत शिवसेनेत दाखल झालेल्या निर्मला गावित या तिसºयांदा नशीब आजमावणार आहेत. त्या माजी खासदार माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. मालेगाव मतदारसंघात माजी आमदार रशीद शेख यांचे सुपुत्र व कॉँग्रेसचे विद्यमान आमदार असिफ शेख पुन्हा एकदा कॉँग्रेसकडून उमेदवारी करत आहेत. निफाड मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदम आणि मंदाकिनी कदम यांचे सुपुत्र यतिन कदम हे अपक्ष उमेदवारी करत नशीब आजमावत आहेत. नाशिक पूर्वमध्ये मनसेचे माजी आमदार उत्तमराव ढिकले यांचे सुपुत्र राहुल ढिकले यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची पूर्ण तयारी केली आहे.नातेवाइकांचाही भरणायेवला मतदारसंघात शिवसेनेने संभाजी पवार यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. संभाजी पवार हे येवला मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिलेले मारोतराव पवार यांचे पुतणे आहेत. सिन्नर मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे यांनाही राजकीय वारसा आहे.1962 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत कॉँग्रेसकडून विजयी झालेले शंकर वाजे यांचे ते नातू तर माजी आमदार रुक्मिणी वाजे या त्यांच्या चुलती आहेत. नाशिक मध्यमधून भाजपकडून उमेदवारी करणाºया आमदार देवयानी फरांदे या माजी आमदार ना. स. फरांदे यांच्या चुलत सून आहेत, तर बागलाण मतदारसंघातून राष्टÑवादीकडून उमेदवारी जाहीर झालेल्या विद्यमान आमदार दीपिका चव्हाण या माजी आमदार संजय चव्हाण यांच्या पत्नी आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक