शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 17:37 IST

Maharashtra Assembly Election 2024 Saroj Ahire : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

नाशिकमधीलदेवळाली मतदारसंघाची निवडणूक यंदा महायुतीतील घटक पक्षातील राजकारण व हेव्यादाव्यामुळे अंतर्गत डोकेदुखी प्रचारापूर्वी तापदायक आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच दरम्यान आता अहिरे यांच्या प्रचारास सुरुवात झाली आहे. याच दरम्यान त्या भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या. 

"२० तारखेला ही जनता माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं आहे त्याला उत्तर देईल" असं म्हटलं आहे. "जनतेचं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही. या जनतेने माझ्याकडे काहीच नसताना मला पदरात घेतलं. त्यामुळे या मायबाप जनतेची मी मनापासून ऋणी आहे. तो विषय काढला की मी भावनिक होते. हे प्रेम मी आयुष्यभर टिकवणार आहे." 

"पदं येतील जातील पण हे प्रेम आयुष्यभर टिकवणार आहे. आशीर्वादाला आम्ही मुकलो होतो आता आम्ही प्रचंड समाधानी आहोत" असं म्हणत असताना सरोज अहिरे यांचे डोळे पाणावले. "आमच्याकडून फक्त मेसेज जातोय आणि लोक मोठ्या संख्येने प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. काही लोक स्वतःच्या गाड्या आणि जेवणाचे डबे सोबत घेऊन प्रचाराला येत आहे."

"गाडी उघडली तर जेवणाचे डबे दिसतील. २०१९ साली जसा प्रचार झाला तसाच प्रचार यंदा जनतेकडून सुरू आहे. २० तारखेला ही जनता माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं आहे त्याला उत्तर देईल" असं सरोज अहिरे यांनी म्हटलं आहे. TV9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. सुनील कोथमिरे, संतोष साळवे, तनुजा घोलप, प्रकाश दोंदे, दिलीप मोरे, रामदास सदाफुले या सहा जणांनी अखेरच्या दिवशी माघार घेतली. 

माघारी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज आहिरे, शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे योगेश घोलप, मनसेच्या मोहिनी जाधव, वंचितचे अविनाश शिंदे, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे विनोद गवळी, राजू मोरे, अमोल कांबळे, कृष्णा पगारे, रविकिरण घोलप, लक्ष्मी ताठे, भारती वाघ हे १२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या मुदतीनंतर उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४devlali-acदेवळालीNashikनाशिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण