शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

महाले खून प्रकरणातील दोघांना आजन्म जन्मठेप

By admin | Updated: March 4, 2017 01:41 IST

नाशिक : एकाचा खून, तर दुसऱ्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी प्रभात आढाव (२७) व अनिल यादव दोघांनाही अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱआऱवैष्णव यांनी आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली़

 नाशिक : ग्रुपमध्ये सहभागी होत नसल्याच्या कारणावरून झालेले भांडण मिटविण्याच्या बहाण्याने बोलावून घेतलेल्या दोघांपैकी एकाचा खून, तर दुसऱ्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी प्रभात रमेश आढाव (२७) व अनिल जगन्नाथ यादव (२६, दोघेही रा़उपेंद्रनगर, सिडको) दोघांनाही अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱआऱवैष्णव यांनी शुक्रवारी (दि़३) आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ उपेंद्रनगरच्या मैदानात २००९ मध्ये ही घटना घडली होती़उपेंद्रनगरमधील आरोपी प्रभात आढावच्या (पीए) ग्रुपमध्ये सामील होत नसल्याच्या कारणावरून योगेश भाऊलाल महाले (१७) व दिनेश राजाराम पाटील (१८) यांच्यासोबत वाद होते़ ३ नोव्हेंबर २००९ रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास महाले व पाटील गिरणार स्वीटजवळ बसले होते़ आरोपी प्रभातने फोन करून मागील भांडण मिटविण्यासाठी योगेश व दिनेशला उपेंद्रनगरच्या मैदानावर बोलावले़ बॉबी नावाच्या मित्राच्या दुचाकीवरून हे दोघे मैदानावर गेले़ उपेंद्रनगरच्या मैदानावर दबा धरुन बसलेले आरोपी प्रभात आढाव, अनिल यादव व आणखी एक अल्पवयीन असे तिघे हातात चाकू घेऊन पळत आले़ यापैकी आरोपी प्रभातने योगेशवर, तर अनिल यादवने दिनेशवर चाकूने सपासप वार केले़ यामध्ये वर्मी घाव लागल्याने योगेश महालेचा जागीत मृत्यू, तर दिनेश पाटील गंभीर जखमी झाला़ या हल्ल्यादरम्यान अल्वयीन संशयिताने या दोघांनी धरून ठेवण्याचे काम केले़ या दरम्यान, जखमींचे मित्र संदीप घुसळे, विजय सोनवणे व बॉबी हे मैदानावर पोहोचले़ त्यांनी मयत योगेशला जिल्हा रुग्णालयात, तर दिनेशला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले़या प्रकरणी दिनेश पाटीलच्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी तिघांविरूद्ध खून व खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला़या खटल्यामध्ये सरकारी वकील कल्पक निंबाळकर यांनी दहा साक्षीदार तपासले़ त्यामध्ये जखमी विजय सोनवणे, प्रत्यक्षदर्शी विजय सोनवणे यांची साक्ष व वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला़ न्यायाधीश वैष्णव यांनी खुनाच्या गुन्ह्यात या दोघांना आजन्म जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, तर खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ या दोन्ही शिक्षा एकत्रित (कन्करंट) भोगावयाच्या असल्याचे निकालात म्हटले आहे़ या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख पाटील यांनी केला़ (प्रतिनिधी)