शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

ं‘माहा’ चक्रीवादळाचा धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 00:43 IST

नाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘माहा’ चक्रीवादळाचा धसका अनेक जिल्ह्यांनी घेतला आहे. अतिवृष्टी, महापूर आणि आता अवकाळी पावसामुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागलेल्या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्याबरोबर मालमत्तेच्या बचावाचे आव्हान उभे राहिले आहे. पालघरमधील शाळांना ६ ते ८ तारखेपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा प्रशासनानेदेखील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

ठळक मुद्देनुकसानीची भीती : पालघरमध्ये शाळांना सुटी जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘माहा’ चक्रीवादळाचा धसका अनेक जिल्ह्यांनी घेतला आहे. अतिवृष्टी, महापूर आणि आता अवकाळी पावसामुळे नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागलेल्या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्याबरोबर मालमत्तेच्या बचावाचे आव्हान उभे राहिले आहे. पालघरमधील शाळांना ६ ते ८ तारखेपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा प्रशासनानेदेखील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.राज्याला अवकाळी पावसाने झोडपल्याने राज्यातील शेतीचे नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचा इशारा देण्यात आल्यामुळे अनेक जिल्ह्यांनी धसका घेतला आहे. विशेषत: शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नसे तसेच पूर आल्यास नदी, नाले ओलांडणे जिकिरीचे ठरू शकते. त्यामुळे आदिवासी बहुल तालुक्यांमधील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील शाळांना सुटी देण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्याने अद्याप तशी घोषणा केलेली नाही. राज्य आपत्ती व्यवस्थापन सतर्क बहुतेक जिल्ह्यांनी जवळपास पंचनामे पूर्ण केले असून, दोन दिवसांत सर्व पंचनामे पूर्ण करून अंतिम नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला पाठविला जाण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे प्रशासन सावरत असतानाच चक्रीवादळामुळे अतिवृष्टीची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी आपापल्यापरिने आताच पिकांची काळजी सुरू केली आहे.‘माहा’ चक्रीवादळामुळे पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार येथे अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविल्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन आणि प्रभाग मंत्रालयाने उत्तर महाराष्टÑासह ठाणे आणि पालघर जिल्ह्याला सतर्कतेबरोबरच उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस