सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या सचिवपदी मच्छिंद्र चिने यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 17:49 IST2020-12-23T17:46:58+5:302020-12-23T17:49:32+5:30
सिन्नर: तालुका पतसंस्था फेडरेशनच्या सचिवपदी मच्छिंद्र चिने यांची एकमताने निवड करण्यात आली. फेडरेशनचे नामकर्ण आवारे यांनी नुकताच सचिवपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.

सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनच्या सचिवपदी मच्छिंद्र चिने यांची निवड
सोमवारी फेडरेशनच्या संचालक मंडळाची सभा संस्थेचे अध्यक्ष अंबादास वाजे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी कार्याध्यक्ष राजेंद्र अंकार, उपाध्यक्ष डॉ. डी. एल. पवार, संचालक कैलास निरगुडे, युनूस शेख, इलाही शेख, कैलास क्षत्रिय उपस्थित होते. तालुक्यातील पतसंस्थांच्या अडचणी दूर करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी पतसंस्थांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रारंभी दिवंगत संचालिका स्व. विजया सांगळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.