अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष; आरोपीस चार वर्षांची सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:15 IST2020-07-14T20:38:53+5:302020-07-15T01:15:59+5:30
लासलगाव : निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमीष दाखवून अश्लील छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायलर केल्याचा आरोपावरून आकाश नागेश सोनवणे यास निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर .जी वाघमारे यांनी चार वर्षांची तर विनयभंगासह पोस्को कायद्याच्या कलमाअंतर्गत एक लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष; आरोपीस चार वर्षांची सक्तमजुरी
लासलगाव : निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमीष दाखवून अश्लील छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायलर केल्याचा आरोपावरून आकाश नागेश सोनवणे यास निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर .जी वाघमारे यांनी चार वर्षांची तर विनयभंगासह पोस्को कायद्याच्या कलमाअंतर्गत एक लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. निफाड येथील न्यायालयाचे इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या दंडाची शिक्षा ठोठावली असून या दंडाचे रक्कमेतील दहा हजार रूपये शासनास तर ९० हजार रु पये पिडितेस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सन २०१८ मध्ये पिंपळगाव नजीक येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमीष दाखवून तिचे अश्लील फोटो काढले व मुलीने लग्नास नकार दिल्यावर फोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लासलगाव पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी आकाश नागेश सोनवणे याच्याविरुदद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. दरम्यान, निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. गुन्हयाचा गंभीर प्रकार लक्षात घेऊन आरोपी आकाश सोनवणे हा दोन वर्षे कारागृहातच आहे. या खटल्यात निफाड येथील जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. रमेश कापसे यांनी महत्वाचे १७ साक्षीदार तपासले. त्यानंतर विविध कलमांखाली न्यायालयाने आरोपीस चार वर्षे सक्तमजुरी व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
-----------------
पीडितेस ९० हजार रुपये देण्याचे आदेश
जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी आकाशसोनवणे यास दोषी धरून ४ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा ,लैंगिक अपराधापासुन बालकांचे संर कायदा २०१२ चे कलम व १२ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महीने सक्तमजुरीची शिक्षा ,भादंवि कलम ३५४ नुसार तीन वर्षे शिक्षा व पाच हजार रूपये दंडाची व दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा, माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००२ चे कलम ६७ नुसार ४ वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सह महिने सक्तमजुरी तसेच माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ नुसार तीन वर्षे सक्तमजुरी व ३० हजार रूपये दंडाची व दंड न दिल्यास ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. दंडाच्या रकमेतील ९० हजार रुपये पीडितेस देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. या खटल्यात सरकारच्या वतीने जिल्हा सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड.रमेश कापसे यांनी काम पाहिले.