खरेदीच्या बहाण्याने सोन्याच्या बांगड्या लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 01:45 IST2022-07-18T01:44:58+5:302022-07-18T01:45:28+5:30

दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या महिलेने दागिने चोरून नेल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Lumpas gold bangles on the pretext of shopping | खरेदीच्या बहाण्याने सोन्याच्या बांगड्या लंपास

खरेदीच्या बहाण्याने सोन्याच्या बांगड्या लंपास

नाशिक : दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या महिलेने दागिने चोरून नेल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपूर्व लक्ष्मण दराडे (३०, रा.पंडित कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (दि.१४) दुपारी सव्वाच्या सुमारास ही चोरी झाली.

अपूर्व यांच्या फिर्यादीनुसार, संशयित अंजू चोपडा (३७) ही महिला शरणपूर रोडवरील एका सराफी दुकानातून बांगड्या खरेदीच्या बहाण्याने आली होती. बांगड्या पसंत पडल्या नाहीत, असे कारण सांगून चोपडा दुकानातून बाहेर पडल्या. शुक्रवारी (दि.१५) रात्री दुकानातील सोन्याच्या दागिन्यांची तपासणी करताना, त्यात ३६.२०९ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या गायब असल्याचे आढळले. त्यामुळे अपूर्व यांनी तेथील सीसीटीव्हीची पाहणी केली असता, त्यात संशयित चोपडा ही महिला त्या दोन बांगड्यांची चोरी करून घेऊन गेल्याचे दिसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Lumpas gold bangles on the pretext of shopping