घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:56 IST2019-10-19T23:37:43+5:302019-10-20T00:56:02+5:30
परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील १ लाख २५ हजार ५०० रु पये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे

घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास
गंगापूर : परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील १ लाख २५ हजार ५०० रु पये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. गंगापूर परिसरातील घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी आतील लोखंडी कपाटातील लॉकरचे दरवाजे तोडून २५ हजार रुपये किमतीची गळ्यातील सोनसाखळी, ३५ हजार रु पये किंमत असलेली सोन्याची वेढ्याची अंगठी, ३० हजार रु पये किमतीचे मंगळसूत्र, १५ हजार रुपये किमतीचे कानातील टॉप्स, अडीच हजार रु पये किमतीचे मुलाचे लॉकेट, १० हजार रुपये किमतीचा चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम
१ लाख २५ हजार ५०० रु पये किमतीचा ऐवज चोरून नेला.
देवळालीत पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला
देवळाली कॅम्प : येथील बालगृहरोड परिसरात एका युवकाने रागात पत्नी ज्योती पाबळे (३३) हिच्यावर चाकूने शरीरावर विविध ठिकाणी वार करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित अनिल पाबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीच्या जबानीवरून संशयित पती अनिल पाबळे यास तत्काळ अटक केली आहे. फिर्यादी ज्योती यांनी पोलिसांकडे नोंदविलेल्या जबानीनुसार सदर पती-पत्नी यांची कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाचा राग मनात धरून संशयित अनिल याने पत्नी घरी येत असताना शिवीगाळ केली. चाकूने तिला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीररीत्या जखमी केले. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संशयित अनिल पाबळे यास पोलिसांनी अटक केली आहे.