शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
4
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
5
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
6
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
7
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
8
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
9
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
10
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
11
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
12
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
13
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
14
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
15
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
16
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
18
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
19
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
20
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

हरवलेले नितीन पवार व्हिडीओद्वारे प्रगटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 7:43 PM

राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींनंतर नॉट रिचेबल असलेले जिल्ह्यातील आमदार नितीन पवार अखेर व्हिडीओद्वारे प्रगटल्याने त्यांच्या समर्थकांनी सुस्कारा सोडला आहे.

नाशिक : राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींनंतर नॉट रिचेबल असलेले जिल्ह्यातील आमदार नितीन पवार अखेर व्हिडीओद्वारे प्रगटल्याने त्यांच्या समर्थकांनी सुस्कारा सोडला आहे.शनिवारी सकाळी राजभवनात फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी झाल्याने जो राजकीय भूकंप झाला त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील आमदार माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ व दिलीप बनकर हे तिघे उपस्थित असल्याचे पहावयास मिळाले होते. या शपथविधी समारंभानंतर हे तिघेही आमदार नॉट रिचेबल झाले होते. तर शनिवारी सकाळी मुंबईकडे निघालेले कळवणचे आमदार नितीन पवारदेखील संपर्काबाहेर गेले होते. यातील दिलीप बनकर हे कुटुंबीयांतील एकाच्या शस्त्रक्रियेच्या निमित्ताने शनिवारी सायंकाळीच नाशकात आले व पत्रकार परिषद घेऊन आपण पक्षासोबत व पवार कुटुंबीयांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र झिरवाळ, कोकटे व नितीन पवार यांचा संपर्क होऊ शकला नव्हता. कोकाटे यांना गुजरातमध्ये, तर नितीन पवार व झिरवाळ यांना दिल्लीत पाठविण्यात आल्याचेही म्हटले जात होते. परंतु कोणाचाही संपर्क होत नसल्याने अधिकृत माहिती मिळू शकत नव्हती. त्यामुळे शनिवारी रात्री उशिराने झिरवाळ व नितीन पवार यांच्या कुटुंबीयांनी ते हरविल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती.दरम्यान, रविवारच्या मुंबईतील राष्टÑवादीच्या बैठकीत आमदार कोकाटे उपस्थित राहिल्याचे बोलले गेले, तर नितीन पवार यांचा स्वत:चा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. आपण सुरक्षित असून, पक्षासोबतच असल्याचे त्यांनी या व्हिडीओत म्हटले असले तरी, यावेळची त्यांची देहबोलीवरून ते तणावात असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. त्यामुळे ते सुरक्षित असतील व पक्षासोबतही असतील तर एवढे तणावात कसे, असा प्रश्न मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. व्हिडीओद्वारे प्रगटणारे नितीन पवार कुटुंबीयांना किंवा आपल्या समर्थकांना प्रत्यक्ष अथवा मोबाइलव्दारे का संपर्क करू शकलेले नाही, असाही प्रश्न उपस्थित होत असून, त्यामुळे त्यांच्याबद्दलचा संभ्रम वाढून गेला आहे. तथापि, राष्टÑवादीच्याच पदाधिकाऱ्यांकडून झिरवाळ व नितीन पवार हे पक्षाच्या संपर्कात आल्याचे सांगितले गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी व समर्थकांनीही सुस्कारा सोडला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसManikrao Kokateमाणिकराव कोकाटेNarhari Jhariwalनरहरी झिरवाळNashikनाशिक