राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी भगवान नागेश्वरास महाभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:47 IST2019-01-13T22:59:36+5:302019-01-14T00:47:25+5:30
जगद्गुरु जनार्दनस्वामी मौनगिरी महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील विविध जिल्ह्यात सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी ओझर येथील जय बाबाजी भक्तपरिवाराने ग्रामदैवत भगवान नागेश्वरास महाभिषेक करून साकडे घातले.

राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी ओझरच्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने ग्रामदैवत भगवान नागेश्वर महादेवास महाभिषेक करताना भक्त परिवार.
ओझर टाउनशिप : जगद्गुरु जनार्दनस्वामी मौनगिरी महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील विविध जिल्ह्यात सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी ओझर येथील जय बाबाजी भक्तपरिवाराने ग्रामदैवत भगवान नागेश्वरास महाभिषेक करून साकडे घातले.
देशातील राजकीय परिस्थिती पारदर्शक करण्यासाठी राजकारणाच्या शुद्धीकरणाची संकल्पना मांडून जनजागृती करणारे स्वामी शांतिगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणूक लढवून राजकारणाच्या शुद्धीकरणाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ करावा. यासाठी ओझर जय बाबाजी भक्त परिवार आणि ग्रामस्थांनी येथील ग्रामदैवत भगवान नागेश्वर महादेवास ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात समुदायिक महाअभिषेक, महाआरती करून साकडे घातले.
याप्रसंगी बाळासाहेब गोडसे, पुंडलिक शिवले, रवींद्र चौधरी, सचिनगुरु किरपेकर, अमर आढाव, सीताराम बिडवे, पोपटराव शेलार, गणेश चौधरी, विजय शिंदे, पांडुरंग जाधव, राहुल शेलार, स्वप्निल माळी, दुर्गेश जाधव, शुभम जाधव, रामेश्वर शिवले, सचिन महाले यांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.