४० हजारांचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 01:00 IST2019-03-13T00:59:23+5:302019-03-13T01:00:19+5:30
गंगापूररोडवरील आनंदवली परिसरातील माळीवाडा येथे अज्ञात चोरट्याने तुकाराम सयाजी गलांडे (४४, रा.आंनदवली) यांच्या घरात शिरून सुमारे ४० हजार रुपये किमतीचा सोनी कंपनीचा कॅमेरा लंपास केला.

४० हजारांचा ऐवज लुटला
नाशिक : गंगापूररोडवरील आनंदवली परिसरातील माळीवाडा येथे अज्ञात चोरट्याने तुकाराम सयाजी गलांडे (४४, रा.आंनदवली) यांच्या घरात शिरून सुमारे ४० हजार रुपये किमतीचा सोनी कंपनीचा कॅमेरा लंपास केला. याप्रकरणी गलांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गलांडे यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा गैरफायदा घेत चोरट्याने व्हिडिओग्रॉफी कॅमेरा, तीन बॅटऱ्या, एक एलइडी लाइट, दोन मेमरी कार्ड असा एकूण ४० हजारांचा ऐवज असलेली बॅग चोरट्याने पळवून नेल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पुढील तपास सुरू आहे.