शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वाळवणीचे पदार्थ बनविण्याची लगबग

By admin | Updated: March 3, 2017 00:55 IST

खामखेडा : गेल्या आठ-दहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने महिला वाळवणीचे पदार्थ बनविण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 खामखेडा : गेल्या आठ-दहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने महिला वाळवणीचे पदार्थ बनविण्याची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यानंतर म्हणजे मार्च महिन्यापासून महिलावर्ग वाळवणीचे पदार्थ तयार करतात. आता लग्नसराईचा हंगामही सुरू झाला आहे. ज्या घरी लग्न म्हटले की तेथे हे वाळवणीचे पदार्थ तयार करावे लागतात. म्हणजे यात वडे, पापड, कुरडई, शेवया, बटाटे चकली, मसाले आदि कामे मार्च महिन्यात करतात. मार्च महिन्यात कडक उन्हाळा असतो. या उन्हामध्ये वाळवणीचे पदार्थ लवकर वाळतात. परंतु चालू वर्षी मार्च महिन्यामध्ये सतत ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे कडक ऊन न पडल्यामुळे वाळवणीचे पदार्थ बनविण्यास उशीर झाला आहे.पूर्वी वाळवणीचे पदार्थ बनविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये अत्याधुनिक साधने नव्हती, त्यामुळे सात-आठ महिला ग्रुप तयार करून एकमेकींचे पदार्थ बनवित असत. पूर्वी वड्याच्या डाळी घट्यावर दळल्या जात असे, परंतु आता वड्याच्या डाळी दळण्यासाठी विजेवर चालणाऱ्या चक्क्या आल्या. त्यावेळेस पिठाच्या गिरणीतून उडीद किंवा नागलीचे दळून आल्यावर महिला घरीच पापड लाटत असत. एका घरचे पापड तयार करण्यासाठी पाच महिलांना दोन दिवस लागत असे. परंतु आता पापड बनविणारे मशीन आले. आता अवघ्या एक तासात पापड तयार होतात. कुरडयाचे ओले गहू दळण्याचे यंत्र आले, त्यामुळे आता पूर्वीसारखा जास्त वेळ लागत नाही. आता पूर्वीसारखे जास्त दिवस लागत नाही. एप्रिल महिना लागल्यापासून आकाशातील वातावरण स्वच्छ होऊन उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. वडे, पापड, कुरडया आदि पदार्थ बनविण्यासाठी अनुकूल वातावरण तयार असल्याने महिला वडे, पापड, कुरडया, बटाटा चकली, साबुदाणा चकली, नागलीचे पापड आदि पदार्थ बनविण्यात व्यस्त आहेत. काही वेळेस त्यांना पुरु षांनाही मदत करावी लागते.आता महिला बचतगट वडे, पापड, कुरडया, मसाले, शेवया आदि आॅर्डर घेऊन हे सर्व पदार्थ घरी पोहोच करतात. त्यामुळे महिलांना रोजगार मिळतो. आता बाजारात सर्व तयार पदार्थ मिळू लागल्याने तयार घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. परंतु अजून ग्रामीण भागात मात्र वाळवणीचे पदार्थ घरीच तयार करतात. (वार्ताहर)