शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

किसानसभेच्या लाँग मार्चची मुंबईच्या दिशेने आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 12:13 IST

एकचा नारा, सातबारा कोरो, दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आदी प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो शेतकरी, आदीवासी लॉंग मार्च करीत नाशकातून मुंबईच्या दिशेने आगेकुच करीत निघाले आहे. 

ठळक मुद्देशेतकरी, आदिवासींचा नाशिक मुंबई लाँग मार्चमुंबईत 27 मार्चाला विधानसभेवर धडकणार सरकारने यापूर्वी दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा किसान सभेचा आरोप

नाशिक - एकचा नारा, सातबारा कोरो, दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आदी प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो शेतकरी, आदीवासी लॉंग मार्च करीत नाशकातून मुंबईच्या दिशेने आगेकुच करीत निघाले आहे. शेतकऱ्याच्या व आदीवासींच्या प्रश्नावर बुधवारी (दि.२०) दिवसभरात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने शेतकरी, आदिवासी नाशिक मुक्कामी आले होते. त्यामुळे पुढील परीस्थितीचे गांभीर्य ओळखून शासकीय विश्रामगृहातील शिवनेरी दालनात जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, आमदार जिवा पांडू गावित, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या शिष्टमंडळाने तब्बल अडीच तास चर्चा केली. पंरुतु, तोडगा निघू न शकल्याने रात्री पुन्हा दीड तास चर्चा झाली, परंतु, ही चर्चा निष्फळ झाल्याने गुरुवारी (दि.२०) सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारेस नाशिकवरून मुंबईच्या दिशेने ‘लॉँग मार्च’ चा सरुवात झाली. प्रथम मोर्चेकऱ्यांची वाहने  पुढे निघाल्यानंतर पाठीमागून एकामागून एक शेतकऱ्यांची पाऊले निघूल लागल्याने संपूर्ण मुंबईनाका परिसारत लाल वादळ  घोंगावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, मोर्चाकऱ्यांमुळे मुंबईनाका परिसरात वाहतूकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याने बारावीच्या परीक्षेचा परिलाच पेपर देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात हाल झाले. पोलिसांनी चोख बंदोबस्त राखत ठराविक अंतराने वाहतुकीला रस्ता करून दिल्याने परीक्षार्थींना दिलासा मिळाला.

दरम्यान. किसान सभेच्या या मोर्चात नाशिकचे माजी खासदार समीर भूजबळ यांच्यासह माजी आमदार नितीन भोसले, जयंत जाधव, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. त्यांनी इंदिरानगरपर्यंत लाँगमार्चमध्ये सहभाग घेतला. मुंबई नाका परिसरातून निघालेला मोर्चा पाथर्डी फाटा परिसरात पोहचला असता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याने येथे काहीकाळ मोर्चा थांबल्यानंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकKisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चFarmerशेतकरीforestजंगल