नॅशनल कराटे चॅम्पियनशीप स्पर्धेत लोहोणेर जनताच्या खेळाडुंचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 21:21 IST2019-02-18T21:20:34+5:302019-02-18T21:21:17+5:30
लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयातील खेळाडूंनी शिटो-रायु-कराटे मार्शल आर्ट क्लब नाशिक यांच्यावतीने आयोजित ६ वी खुली राष्ट्रीय पातळीवरील कराटे स्पर्धा प्रकारात घवघवीत यश संपादन करीत सुवर्णपदक तसेच कांस्यपदकावर आपले नाव कोरले. विद्यालयाचे विद्यार्थी पवन सोनवणे व प्रसाद शेवाळे यांनी सुवर्णपदक तर रोशन शेवाळे आणि मयुर सोनवणे यांनी कांस्य पदक प्राप्त करत हे यश संपादन केले.

लोहोणेर येथील जनता विद्यालयाच्या खेळाडूंनी नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील कराटे स्पर्धा प्रकारात सुवर्ण व कांस्य पदक मिळवल्याबद्दल खेळाडुंचे अभिनंदन करताना मुख्याध्यापक आर. एच. भदाणे समवेत शिक्षक वृंद.
ठळक मुद्दे घवघवीत यश संपादन करीत सुवर्णपदक तसेच कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयातील खेळाडूंनी शिटो-रायु-कराटे मार्शल आर्ट क्लब नाशिक यांच्यावतीने आयोजित ६ वी खुली राष्ट्रीय पातळीवरील कराटे स्पर्धा प्रकारात घवघवीत यश संपादन करीत सुवर्णपदक तसेच कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
विद्यालयाचे विद्यार्थी पवन सोनवणे व प्रसाद शेवाळे यांनी सुवर्णपदक तर रोशन शेवाळे आणि मयुर सोनवणे यांनी कांस्य पदक प्राप्त करत हे यश संपादन केले.
या सर्व खेळाडूंना जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एच. भदाणे क्र ीडा शिक्षक एस. ए. कुटे, एन. एस. आहिरे, विजय निकम तसेच प्रशिक्षक मंगेश पगार व ज्ञानेश्वर पगार आदींचे मार्गदर्शन लाभले.