शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

बंद घरांचे कुलूप तोडले; सहा लाखांचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 5:04 PM

नाशिक : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे ५ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा ऐवज ...

ठळक मुद्देचारचाकीसह तीन दुचाकी लंपासअंबडला दोन लाखांचे रेडिमेड कपडे लंपासपाच लाख ४२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास

नाशिक : गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे ५ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याचे समोर आले आहे. या दोन्ही घटना सिरीन मेडोज, पारिजातनगरसारख्या उच्चभ्रू वसाहतींमध्ये घडल्या असून, याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गंगापूररोडवरील सिरीन मेडोज भागातील यशश्री बंगल्यात राहणारे मधुकर रामचंद्र भंडारी (७६) व त्यांचे शेजारी किशोर खैरनार यांच्या बंद घरांमध्ये स्वयंपाकगृहाद्वारे खिडकीचे गज वाकवून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. चोरट्यांनी या दोन्ही घरांमधून सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची भांडी, रोख रक्कम असा सुमारे पाच लाख ४२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे भंडारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.दुसऱ्या घटनेत कॉलेजरोडवरील पारिजातनगर येथील योगेश मुरलीधर शिरवाडकर (४५) यांच्या बंद घराचे कुलूप चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश केला. घरातील देवघरात ठेवलेल्या गोदरेजच्या लोखंडी कपाटात ठेवलेले ५५ हजारांचे दागिने, रोख रक्कम चोरट्यांनी घेऊन पोबारा केला. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बंद घरे चोरट्यांकडून लक्ष्य केली जात असल्याने पोलिसांच्या गस्तीविषयीदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या दोन्ही घटना दिवसा घडल्या आहेत, हे विशेष! घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बंद घर दिसले की फोडले, असाच जणू कित्ता चोरट्यांकडून गिरविला जात असल्याचे या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.चारचाकीसह तीन दुचाकी लंपासआडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेजूरकर मळ्याशेजारी सचिन सुभाष दुसाणे (वय ४१, रा.कासारवाडी पुणे) यांनी त्यांच्या मालकीची मारुती स्विफ्ट डिजायर (एम.एच.१४ इएच ६७५५) अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. तसेच भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील शालिमार परिसरातून मंगेश जयंत चार्वेकर (वय ३२, रा.जनरल वैद्यनगर, द्वारका) यांच्या मालकीची होंडा युनिकॉर्न दुचाकी (एम.एच.१५ डीवाय २५३५) अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिसºया घटनेत पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील मालेगावस्टॅन्डवरून कैलास भास्कर बरकले (४०, रा.टाकळीरोड) यांची अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५ जीयू ८५३०) अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चौथी घटना मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीतील वडाळारोडवर घडली. कय्युम दिलावर खान (६२, रा.बॉबी बंगला, साईनाथनगर) यांची अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५ एफडी ०९३३) ही त्यांनी वडाळारोडवरील एका लॉन्सबाहेर उभी केली असता चोरट्यांनी ती गायब केली.अंबडला दोन लाखांचे रेडिमेड कपडे लंपासअंबड पोलीस ठाणे हद्दीतील बंदावणेनगर कामटवाडा येथील ‘स्टाइल बेबिजिटर वेल’ नावाने रेडिमेड कपड्यांचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ९७ हजार ५०० रूपयांचे कपडे चोरी केले आहे. योगेश सुरेश मेतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी