विवाह समारंभातून पावणेतीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 17:18 IST2018-12-26T17:18:28+5:302018-12-26T17:18:54+5:30

नाशिक : लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आलेल्या मुंबईतील उल्हासनगरमधील महिलेचे पावणेतीन लाख रुपयांचे सोने व हि-याच्या दागिन्यांची बॅग चोरट्याने चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील बालाजी लक्ष्मीनारायण बॅक्वेंट लॉन्समध्ये सोमवारी (दि़२४) रात्रीच्या सुमारास घडली़

Livestock jewelery stolen from marriage ceremony | विवाह समारंभातून पावणेतीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

विवाह समारंभातून पावणेतीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

ठळक मुद्देगंगापूर रोडवरील घटना : सोने-चांदी व हिऱ्यांचे दागिने; गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आलेल्या मुंबईतील उल्हासनगरमधील महिलेचे पावणेतीन लाख रुपयांचे सोने व हि-याच्या दागिन्यांची बॅग चोरट्याने चोरून नेल्याची घटना गंगापूर रोडवरील बालाजी लक्ष्मीनारायण बॅक्वेंट लॉन्समध्ये सोमवारी (दि़२४) रात्रीच्या सुमारास घडली़

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोहनी राजू उत्तमानी (५४, रा़ ३०१, भारत कॉम्प्लेक्स, उल्हासनगर) या सोमवारी नातेवाइकांच्या लग्नाच्या विवाह समारंभासाठी गंगापूर रोडवरील लक्ष्मीनारायण बॅक्वेंट हॉल येथे आल्या होत्या़ रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास १८ ते २२ वर्षांच्या संशयिताने जेवणाच्या टेबलजवळ ठेवलेली त्यांची बॅग व त्यातील २ लाख ७४ हजार ३०० रुपये किमतीचे सोने व हि-याचे दागिने चोरून नेले़

या बॅगमधील चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याच्या साखळीत हिरे असलेले मंगळसूत्र, दोन सोन्याच्या चेन, चार पँडल सेट, हिरेजडीत सोन्याचे ब्रेसलेट, चार हिरेजडीत अंगठ्या, हिरेजडीत एअररिंग्ज व ६ हजार ३०० रुपये रोख रकमेचा समावेश आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Livestock jewelery stolen from marriage ceremony