अशोका मेडिकेअर हॉस्पिटल येथे ग्रीन कॉरिडॉरने यकृत प्रत्यारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:02+5:302021-09-03T04:16:02+5:30
सिक्स सिग्मा हॉस्पिटल येथे ब्रेन डेड पेशंटचे अवयव दान करण्याचे ठरले. अवयव संध्याकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी निघून अवघ्या ...

अशोका मेडिकेअर हॉस्पिटल येथे ग्रीन कॉरिडॉरने यकृत प्रत्यारोपण
सिक्स सिग्मा हॉस्पिटल येथे ब्रेन डेड पेशंटचे अवयव दान करण्याचे ठरले. अवयव संध्याकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी निघून अवघ्या १५ मिनिटात म्हणजेच ७ वाजून ४८ मिनिटात अशोका मेडिकेअर हॉस्पिटलला पोहोचले. अशोका हॉस्पिटल येथे झेटीसीसीच्या नोंदीनुसार एका पेशंटला हे यकृत मिळाले. अशोका मेडिकेअरच्या डॉक्टरांच्या टीमने हे अवयव आता प्रत्यारोपण चालू केले आहे. हे ऑपरेशन रात्रभर चालण्याची शक्यता असून डॉ. तुषार संकलेचा, डॉ जी. बी. सिंघ यांच्या देखरेखीखाली डॉक्टरांची टीम ही शस्त्रक्रिया करीत आहे. दरम्यान, अमोल दुगजे यांनी अवयव प्रत्यारोपण समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली असून डॉ. सुशील पारख, सचिन बोरसे, रितेश कुमार, डॉ. सागर पालवे यांच्या प्रयत्नातून ही सुविधा देण्यात येत आहे.